नाशिक

मुकणे, मुळा धरणावर फ्लोटिंग सोलर प्रकल्प

CD
मुकणे, मुळा धरणावर फ्लोटिंग सोलर प्रकल्प --- ‘जलसंपदा’चा पुढाकार : २३५ मेगावॉटची वीजनिर्मिती सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ११ : हरित ऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील मुकणे धरणाच्या जलाशयावर ८५ मेगावॉट, तसेच अहिल्यानगरमधील मुळा धरणाच्या जलाशयावर १५० मेगावॉटचा फ्लोटिंग सोलर फोटो व्होल्टाइक प्रकल्प आणि बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टिम उभारण्यात येणार आहे. जलसंपदा विभागाच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने त्यासाठी पुढाकार घेतला. देशात सन २०३० पर्यंत अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील क्षमतेत वाढ करण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. सोलर ऊर्जा निर्मितीवर सरकारने लक्ष केंद्रीत केले. या उद्देशाचा एक भाग म्हणून महाराष्ट्रातही २०२५-२६ ते २०३५-३६ या कालावधीत स्वतंत्र नवीकरणीय ऊर्जा व ऊर्जा साठवणूक धोरण राबविण्यात येत आहे. या धोरणांतर्गत गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाने गोदावरी उर्ध्व खोऱ्यातील मुकणे व मुळा या धरणांवर फ्लोटिंग सोलर प्रकल्पासाठी खासगी कंपन्यांकडून निविदा मागविल्या. मुकणे जलाशयाच्या सुमारे १२८ हेक्टर जलक्षेत्रात चार स्वतंत्र पट्ट्यांमध्ये फ्लोटिंग सोलर प्रकल्प उभारला जाऊ शकतो. त्यानुसार सुमारे ११९ मेगावॉट पीक (डीसी) आणि ८५ मेगावॉट एसी क्षमतेची उभारणी शक्य आहे. प्रकल्पात सौरऊर्जेबरोबर बॅटरी स्टोअरेजची व्यवस्था केली जाईल. या प्रकल्पासाठी २०२८-२९ या आर्थिक वर्षातील संभाव्य व्यावसायिक कार्यान्वयनाचा विचार करण्यात आला आहे. राज्याच्या अक्षय ऊर्जा व ऊर्जा साठवणूक धोरणानुसार किमान ८५ मेगावॉटच्या ५० टक्के म्हणजे ४२.५ मेगावॉट स्टोअरेज पॉवर आणि किमान दोन तासांची स्टोअरेज क्षमता अपेक्षित आहे. दरम्यान, मुळा धरणाच्या जलाशयातील सुमारे २३८.६ हेक्टर जलक्षेत्र चार स्वतंत्र पट्ट्यांमध्ये फ्लोटिंग सोलर प्रकल्पाची व्यवहार्यता असल्याचे प्राथमिक अभ्यासातून समोर आले. --- वाडीवऱ्हेला जोडणार मुकणे धरणावरील प्रकल्पासाठी आवश्यक जलक्षेत्र आणि किनाऱ्यावरील पायाभूत सुविधा गोदावरी मराठवाडा महामंडळाकडून भाडेपट्ट्याने सवलत कराराच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जातील. हा प्रकल्प चार किलोमीटरवरील वाडीवऱ्हे उपकेंद्राशी जोडला जाऊ शकतो. हे प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर विकसित केले जाणार आहेत. त्यासाठी पायाभूत सुविधा, अक्षय ऊर्जा, बॅटरी स्टोअरेज, गुंतवणूक तसेच संबंधित क्षेत्रातील अनुभवी कंपन्यांना सहभागी होता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugarcane Crisis : महाराष्ट्राचे ठरले, कर्नाटकातील गळीत हंगाम कधी? साखर कारखान्यांना दुहेरी फटका बसण्याची शक्यता; उताऱ्यात घट अन्‌ दराचाही परिणाम

इमोशनलेस असतात ‘या’ राशीचे लोक! समोरच्याने कितीही प्रेम दिलं तरी पडत नाही फरक; पुढे होतो मोठा पश्चात्ताप, आयुष्यात साथ देत नाही कोणी

LPG Cylinder Crisis : भारतात पुन्हा एलपीजी सिलिंडरचा तुटवडा जाणवणार? इराण-अमेरिका युद्धामुळे वाढली चिंता, घरगुती गॅस महागणार?

Latest Marathi News Live Update : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

Kuldeep Yadav: एकाच सामन्यात १० विकेट्स... कुलदीपचा इंग्लंडमध्ये कहर! नोंदवली सर्वोत्तम कामगिरी

SCROLL FOR NEXT