नाशिक

उघड्यावर मांस विक्री बंद

CD
धुळे टुडे २ साठी...मेन (शिल्लक) --- NSK26H29306 धुळे ः मांस विक्रेत्यांना नोटीस बजावताना मनपा कर्मचारी. --- महापालिका क्षेत्रात उघड्यावर मांसविक्री बंद महापालिका प्रशासन; १५ दिवसांत परवाना घेणे बंधनकारक; नियमभंग केल्यास कारवाई सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ११ ः महापालिका क्षेत्रातील चिकन, मटण व मासे विक्रेत्यांनी व्यवसायासाठी महापालिकेचा अधिकृत परवाना घेणे बंधनकारक आहे. परवान्याशिवाय व्यवसाय, तसेच उघड्यावर मांसविक्री करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे. यासंदर्भात मांस विक्रेत्यांना नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली दहा चिकन विक्रेते, १४ मटण विक्रेते व मासे विक्रेते अशा एकूण ४८ विक्रेत्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मांस विक्रेत्यांना नोटिसा मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत ऑनलाइन अर्ज करणे आणि आवश्यक कागदपत्रे व शुल्काची पूर्तता करून १५ दिवसांच्या आत विक्री परवाना प्राप्त करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्राप्त झालेला परवाना दुकानाच्या दर्शनी भागात लावणे, तसेच त्याचे वेळोवेळी नूतनीकरण करणे आवश्यक राहील. परवाना प्राप्त करून घेण्यासाठी महापालिकेच्या संकेतस्थळावर अर्ज करावा, तसेच याबाबतची माहिती मनपा सोशल मीडिया, फेसबुक, इन्स्टाग्राम यावर प्रसारित करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहितीसाठी मालमत्ता व्यवस्थापन अधीक्षक मनीष शेंद्रे यांच्याकडे संपर्क करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. उघड्यावर मनाई मांस, चिकन व मासे यांची विक्री करताना स्वच्छता व सार्वजनिक आरोग्याच्यादृष्टीने विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. विक्रीसाठी ठेवण्यात येणारे मांस दुकानाच्या आत बंदिस्त व स्वच्छ ठिकाणी ठेवावे. दुकानाबाहेर उघड्यावर मांस ठेवणे अथवा ते नागरिकांना उघडपणे दिसेल अशा पद्धतीने मांडणे पूर्णपणे प्रतिबंधित करण्यात आले आहे. तसेच दुकानात डस्टबीन ठेवून निर्माण होणारा कचरा दररोज महापालिकेच्या घंटागाडीमध्येच द्यावा. दुकानाबाहेरील रस्ता, फुटपाथ अथवा सार्वजनिक जागेवर व्यवसायाशी संबंधित साहित्य ठेवून अतिक्रमण करता येणार नाही. ...अन्यथा कारवाई महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतुदींनुसार विनापरवाना मांसविक्री, अस्वच्छ किंवा आरोग्यास अपायकारक मांसविक्री, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचा व्यवसाय सीलबंद करण्यात येऊन मानवी आरोग्यास हानी पोहोचू नये यासाठी परिस्थितीनुसार माल जप्त करून त्याची विल्हेवाट लावण्याची, तसेच कायद्यानुसार पोलिसांच्या माध्यमातून कारवाई करण्याची प्रक्रिया राबविण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugarcane Crisis : महाराष्ट्राचे ठरले, कर्नाटकातील गळीत हंगाम कधी? साखर कारखान्यांना दुहेरी फटका बसण्याची शक्यता; उताऱ्यात घट अन्‌ दराचाही परिणाम

इमोशनलेस असतात ‘या’ राशीचे लोक! समोरच्याने कितीही प्रेम दिलं तरी पडत नाही फरक; पुढे होतो मोठा पश्चात्ताप, आयुष्यात साथ देत नाही कोणी

LPG Cylinder Crisis : भारतात पुन्हा एलपीजी सिलिंडरचा तुटवडा जाणवणार? इराण-अमेरिका युद्धामुळे वाढली चिंता, घरगुती गॅस महागणार?

Latest Marathi News Live Update : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

Kuldeep Yadav: एकाच सामन्यात १० विकेट्स... कुलदीपचा इंग्लंडमध्ये कहर! नोंदवली सर्वोत्तम कामगिरी

SCROLL FOR NEXT