पदकप्राप्त खेळाडूंना दरमहा
पाच हजारांची आर्थिक मदत
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ११ : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक झाली. तीत अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धा, खेलो इंडिया तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदक मिळविणाऱ्या विद्यापीठाच्या गुणवंत खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी दरमहा पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला.
कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता. ९) बैठक झाली. प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, नितीन झाल्टे, प्रभारी अधिष्ठाता जगदीश पाटील, प्राचार्य एस. एस. राजपूत, प्राचार्य महेंद्र रघुवंशी, प्राचार्य शिवाजी पाटील, डॉ. पवित्रा पाटील, डॉ. सुरेखा पालवे, डॉ. संदीप पाटील, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, वित्त व लेखाधिकारी सीए रवींद्र पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. योगेश पाटील उपस्थित होते.
१३ ऑगस्टला झालेल्या क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील प्रथम सभेत खेळाडूंच्या आहाराची आवश्यकता, सरावासाठी लागणारी ऊर्जा, तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांसाठी त्यांची तयारी लक्षात घेऊन पदकविजेत्या खेळाडूंना दरमहा पाच हजार रुपये शिफारस केली होती. या अनुषंगाने व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील गुणवंत खेळाडूंना सहाय्य मिळणार असून, आर्थिक अडचणींमुळे आहार व सरावावर परिणाम होऊ नये, यासाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.