नाशिक

गणपतीला आता शुगर फ्री, डाएटचे उकडीचे मोदक

CD
गणपतीला आता शुगर फ्री, डाएटचे उकडीचे मोदक तळणीचा, उकडीच्या मोदकांमध्ये असंख्य प्रकार उपलब्ध सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १२ : गणपतीला मोदक प्रिय असला तरी, त्यात खवय्यांचे दोन गट पडतात. मोदक उकडीचा की तळणीचा? त्यासाठी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारात गणेशभक्तांसाठी त्यांना अगदी हवे तसे मोदकांचे असंख्य प्रकार बाजारात उपलब्ध झाले आहेत. व्यावसायिकांपासून ते घरगुती उकडीचे मोदक बनवून देणाऱ्या विक्रेत्यांनी आठ दिवसांपूर्वी सोमवारी सणाला हव्या असलेल्या मोदकांची ऑर्डर घ्यायला सुरवात केली आहे. मऊसूत तांदळाच्या पारीत ओला खोवलेल्या नारळाचा चव, गुळ, वेलची पूड घातलेले सारण, पाकळ्यांचा आकाराचा गोलमोल फुगलेल्या वाफवलेल्या उकडीच्या मोदकावर केसर आणि शुध्द तुपाची धार. गणपतीबरोबर गणेश भक्तांचा मोदक आवडीचा पदार्थ. त्यामुळे गणपतीला नैवेद्य दाखविण्यासाठी घराघरात मोदक बनविले जातात. मोदक बनविणे काहीसे संयमाचे आणि वेळखाऊ काम असल्याने नोकरदार महिला तयार मोदक घेण्याला पसंती देतात. मिठाईच्या दुकानात मावा, केशर, मँगो, चॉकलेट उपलब्ध असले तरी, उकडीच्या मोदकांमध्ये सारणात बदल करून असंख्य प्रकार बाजारात उपलब्ध झाले आहेत. आत्ताच्या घडीला आरोग्याचा विचार करता साखर न खाणाऱ्या खवय्यांसाठी शुगर फ्री तसेच डाएट मोदक उपलब्ध आहेत. सणानिमित्ताने मोदक बनविण्यात पारंगत असलेल्या अनेकांनी छोटेखानी व्यवसाय सुरू केला आहे. गणेशोत्सवात गणेशभक्त एकमेकांच्या घरी आरतीसाठी जातात. त्यामुळे दररोज होणाऱ्या आरतीसाठी प्रसाद लागतो. त्यासाठी मोदकांची वैविध्य असणारी मोदक थाळी खास आकर्षक पॅकिंगसह भेटवस्तू म्हणून खरेदीचा पर्याय उपलब्ध आहे. यामध्ये साधारण सहा प्रकारचे मोदक मिळतात. ---चौकट -उकडीचा मोदक : ३० रुपये प्रति नग -तळणीचे मोदक (ओले खोबरे) : २० रुपये प्रति नग -तळणीचे मोदक (सुके खोबरे) : १५ रुपये प्रति नग -सुकामेवा डाएट मोदक, शुगर फ्री गुलकंद पान मोदक, चॉकलेट-मँगो मोदक, चॉकलेट मावा मोदक, इलायची मावा मोदक आदी. -------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''माझा भाऊ...'' मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया

मासिक पाळी आली की गाव सोडावं लागतं, प्रसूतीनंतरही २१ दिवस वनवास; आंध्र प्रदेशातील धक्कादायक प्रथा...

MSRTC Udgir Chaos: उदगीरच्या ४९ एसटी बसेस कोकणात; स्थानिक वाहतुकीचे तीनतेरा, प्रवाशांना बसस्थानकावर ताटकळावे लागले

Leopard Terror: मांजरी खुर्दमध्ये बिबट्याचा कहर; गोठ्यात घुसून वासराचा फडशा, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

National Unity Day : गुजरातमध्ये पार पडणार राष्ट्रीय एकता दिन ; संजीवनीचे बॅण्ड पथक देणार पंतप्रधान मोदींना सलामी

SCROLL FOR NEXT