नाशिक

मातीची मूर्ती घडवूया, निसर्गाचे ऋण फेडूया” कार्यशाळेतून संदेश

CD
शहर टुडे पान चारसाठी - NSK26H29377 जळगाव : गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेत सहभागी विद्यार्थिनींसह प्राध्‍यापक. ---------- शाडू मातीपासून गणेशमूर्तीनिर्मिती कार्यशाळेतून पर्यावरण जनजागृती ------ बेंडाळे महाविद्यालयात विद्यार्थिनींचा सक्रीय सहभाग सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ११ : येथील डॉ. जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयातील कला मंडळातर्फे पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्तीनिर्मिती कार्यशाळेचे आयोजन नुकतेच केले होते. या विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सक्रीय सहभाग घेत पर्यावरण जनजागृती मोहीम समजून घेतली. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. आर. के. नारखेडे अध्‍यक्षस्‍थानी होते. या कार्यशाळेत कलाशिक्षक एन. ओ. चौधरी यांनी विद्यार्थिनींना पर्यावरणपूरक शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याचे सोप्या पद्धतीने प्रशिक्षण दिले. यात गणेशमूर्ती तयार करताना पर्यावरणपूरक साहित्याचा वापर कसा करावा, मूर्तीची रचना व आकारमान कसे ठेवावे, रंगसंगती, सजावट व पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी शाडू मातीच्या मूर्तींचे महत्त्व याबाबत विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. कार्यशाळेत सुमारे ५० विद्यार्थिनी व प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. डॉ. पी. एन. तायडे, उपप्राचार्य डॉ. सत्यजित साळवे, माजी प्राचार्य प्रा. डॉ. व्ही. जे. पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य एन. जी. बावस्कर डॉ. अनिता कोल्हे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI व्यवहारांवर द्यावे लागणार शुल्क; नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचे संकेत, कारणही सांगितलं...

Karmad News : उघड्या लिफ्टमधून बियाण्याची पोती नेताना तरुणाचा मृत्यू; कंपनी मॅनेजर, एचआर अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा

Delhi Police IPS Transfers : दिल्ली पोलिस दलात मोठा फेरबदल; 5 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती? पाहा बदल्यांची यादी

Bogus Doctor Crime : वारजे, खराडीत बोगस डॉक्टरांवर कारवाई; मनपाच्या बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीची कारवाई

Latest Marathi News Live Update : परवानगी नाकारली तरी मुंबईत जाणारच; जरांगेंचा निर्धार

SCROLL FOR NEXT