नाशिक

साथरोग रोखण्यासाठी उपाययोजना करा

CD
धुळे टुडे २ साठी... --- NSK26H29388 (भरत मोरे) --- साथरोगांचा प्रादुर्भाव वाढला; तातडीने उपाययोजना करा भरत मोरे यांची मनपा आयुक्तांकडे मागणी सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ११ ः शहरात सध्या विविध भागांमध्ये डेंगी, टायफॉइड, न्यूमोनिया, व्हायरल इन्फेक्शन यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर तातडीने प्रभावी उपाययोजना राबवून धुळेकरांचे आरोग्य संरक्षित करावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विधानसभा क्षेत्रप्रमुख भरत मोरे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. शहरातील अनेक भागांमध्ये साचलेले पाणी, गटारी, नाले, कचऱ्याचे ढीग व डासांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे साथीचे आजार पसरण्यास पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नाकडे प्रशासनाने केवळ कागदोपत्री कारवाई न करता प्रत्यक्ष मैदानात उतरून तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. विशेषतः आगामी सण-उत्सवांचा काळ लक्षात घेता शहरातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊन संसर्गजन्य आजारांचा प्रसार वेगाने होण्याची शक्यता लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी. प्रमुख मागण्या अशा संपूर्ण धुळे शहरात तातडीने फॉगिंग व औषध फवारणीची विशेष मोहीम राबविण्यात यावी. डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे शोधून तेथे प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय करावेत. शहरातील सर्व गटारी, नाले व जलवाहिन्यांची तातडीने स्वच्छता करण्यात यावी. साचलेले पाणी व घाण त्वरित हटवावी, गढूळ व अस्वच्छ पाणीपुरवठ्याबाबत तातडीने चौकशी करून शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, पाणीपुरवठा स्त्रोतांची नियमित तपासणी करावी, महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत प्रत्येक प्रभागात तातडीने आरोग्य तपासणी शिबिरे घ्यावीत व नागरिकांची तपासणी व आवश्यक मार्गदर्शन करावे, डेंगी व साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव झालेल्या भागांत विशेष सर्वेक्षण मोहीम राबवून संशयित रुग्णांची तपासणी करण्यात यावी. प्रभागनिहाय केलेल्या उपाययोजनांचा सार्वजनिक अहवाल प्रसिद्ध करून नागरिकांना माहिती द्यावी आदी मागण्या भरत मोरे यांनी केल्या आहेत. याबाबत कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja First Look 2026 : प्रतीक्षा संपली! लालबागच्या राजाचा पहिला लूक समोर; बाप्पाचं मनमोहक रूप पाहून भाविक भारावले, पाहा खास फोटो

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

BRICS Summit Food: सत्तू, मखाना अन् काश्मिरी पदार्थ... ब्रिक्स परिषदेतले शाही मेन्यू कोणते? नॉनव्हेज आहे का?

Latest Marathi News Live Update : शिंदेसेनेच्या आमदाराच्या मुलाला अटक, कारण काय?

SCROLL FOR NEXT