प्रांताधिकारी दत्ता यांच्याविरोधात तलाठी एकवटले
तलाठी निलंबन कारवाई : कामबंद आंदोलनाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ११ : इगतपुरी तालुक्यातील एक मंडलाधिकारी व पाच तलाठ्यांवर सहाय्यक जिल्हाधिकारी तथा इगतपूरीचे प्रांताधिकारी पवन दत्ता यांनी निलंबन तसेच वेतनवाढ रोखण्याची कारवाई केली. या कारवाई विरोधात जिल्ह्यातील तलाठी एकवटले आहेत. दत्ता यांच्याकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा आरोप करताना बेकायदेशीर कारवाई विरोधात मंगळवारपासून (ता.१५) कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.
नाशिक जिल्हा तलाठी संघाने शुक्रवारी (ता.११) जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांची भेट घेत निवेदन दिले. त्यामध्ये पवन दत्ता मनमानी करत असून अपमानास्पद वागणूक देत असल्याचा आरोप करण्यात आला. निलंबनाची कारवाई करणाऱ्या तलाठी तसेच मंडलाधिकाऱ्याला कारवाईपूर्वी कोणतीही नोटीस देण्यात आली नाही. त्याउलट दत्ता यांच्याकडून धमक्या दिल्या जात असून महिला कर्मचाऱ्यांशी अरेरावी भाषा वापरत असल्याचा आरोप संघटनेने केले आहे.
त्र्यंबकेश्वर येथे नुकत्याच पार पडलेल्या नियोजित बैठकीत पवन दत्ता यांनी चार जणांवर कारवाई करणार होते. पण, तालुक्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनाचा पवित्रा घेत दत्ता यांचा डाव हाणून पाडल्याचा दावा संघटनेने केला आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामध्ये निलंबन व वेतनवाढ रोखण्याची कारवाई मागे घ्यावी. तसेच दत्ता यांची तातडीने सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा मंगळवारपासून (ता.१५) कामबंद आंदोलन करण्यात येईल. आंदोलन कालावधीत जनतेची अथवा प्रशासकीय कामाच्या गैरसोयीसाठी संबंधित प्रांताधिकारी जबाबदार राहतील, असा इशाराही संघटनेतर्फे देण्यात आला आहे. निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष संजय गाडे, उपाध्यक्ष मोहन गायकवाड व प्रीती अग्रवाल तसेच सरचिटणीस अरुण फसाळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
फोटो क्रमांक : एच-29390
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.