नाशिक

पारंपारिक गौराईंच्या मुखवट्यांना उजाळा

CD
फोटो : H29354 -- पारंपारिक गौराईच्या मुखवट्यांना उजाळा नागपंचमीपासून कामांना वेग; काम अंतिम टप्प्यात सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १२ : शहरात एकीकडे गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे तर, दुसरीकडे घराघरात गौराईच्या आगमनाचे वेध लागले आहेत. पारंपारिक गौराईच्या मुखवट्यांना रंगकाम तसेच पॉलीश करण्याच्या कामाला वेग आला असून, आता अंतिम टप्यातील कामे सुरू आहेत. नागपंचमीपासून या कामांना सुरवात झाली आहे. काही घरांमध्ये दोनशे-तीनशे वर्षांपासून परंपरागत गौराईंचे पितळीचे, चांदीचे, मातीचे तसेच ‘पीओपी’ मुखवटे असतात. त्यात पितळीच्या मुखवट्यांना दरवर्षी पॉलीश करावी लागते. या मुखवट्यांना तीन स्टेपमध्ये पॉलीश केली जाते. सर्वात पहिले जुना कलर काढून टाकला जातो. त्यानंतर चेहरा स्वच्छ करून नवीन रंग दिला जातो. या प्रक्रियेसाठी साधारण दोन दिवस लागतात. आकर्षक आखीव रेखीव नाकी डोळी दिसण्यासाठी मुखवट्यांना थ्री डी पॉलिश केली जाते. नाशिकमधील भांडी बाजार महाराष्ट्रभर प्रसिद्ध असल्याने भांड्याबरोबर मुखवट्यांवर कलाकुसरीचे काम करवून घेण्यासाठी मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर परगावाहून लोक खास नाशिकला येतात. महालक्ष्मींचे मळवट प्रत्येक घरात वेगवेगळ्या पद्धतीने भरले जातात. त्यानुसार देवींचे मळवट भरले जाते. थोडक्यात गंधाच्या प्रकारानुसार डिझाईन केली जाते. यासाठी मुखवट्यांच्या आकारानुसार सातशे रुपयांपासून ते पंधराशे रुपये पॉलीश करण्यासाठी आकारले जातात. यासाठी कारागीर दिवस रात्र काम करीत आहेत. --चौकट दागिन्यांनी फुलणार गौरींचे सौंदर्य गौराईच्या आगमनाला अवघे काहीच दिवस शिल्लक असल्याने गौरींसाठी लागणारे दागदागिने खरेदी मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. मोती हार, कुंदन हार, पोहा हार, मोहन माळ, बोर माळ, ठुशी, बाजूबंद, डोरले, झुबे, कमरपट्टा या पारंपारिक दागिन्यांनी गौराईंचे सौंदर्य खुलणार आहे. -- कोट तीस वर्षांपासून आमचा व्यवसाय आहे. बाहेर जिल्ह्यातून मुखवट्यांना पॉलीश करवून घेण्यासाठी आमच्याकडे येतात. काळ बदलला असला तरी, परंपरागत मुखवट्यांना रंगवून घेतले जाते. - शंकर सातपुते, सदगुरू मेटल्स, भांडी बाजार ------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Savings: 10 रुपयांची बचत करून पती-पत्नी वर्षभरात करतील 1 लाखांचा फंड! ना SIP, ना शेअर मार्केट; काय आहे हे चॅलेंज?

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरण! आमदारपुत्र रोहित गावितला चार दिवसांची पोलीस कोठडी; काल मीरा रोडवरून घेतले होते ताब्यात

Girna Dam Water Storage : नाशिक अन् गुजरातच्या पावसाने गिरणा धरण फुल्ल! 21 हजार हेक्टर शेती फुलणार; काय आहे ताजी स्थिती?

गणपती बसवायचा आणि १५ सप्टेंबरला मुंबईला जायचं; मराठ्यांचं वादळ मुंबईत कधी धडकणार?

Marathi News Live Updates : पुढील २४ तास विदर्भात पावसाची शक्यता,३ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT