नाशिक

गजानन महाराज मंदिरात कार्यक्रम

CD
धुळे टुडे २ साठी... --- फोटो- NSK26H29395 --- श्री गजानन महाराज मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ११ ः श्री गजानन महाराज यांच्या पुण्यतिथी (ऋषीपंचमी) उत्सवानिमित्त श्री सद्‍गुरू गजानन महाराज सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळाच्या रामनगर येथील श्री सद्‍गुरू गजानन महाराज मंदिरात ११ ते १३ सप्टेंबर, तसेच १५ सप्टेंबरला विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष गोपाळराव केले यांनी केले आहे. कार्यक्रम असे ः १२ सप्टेंबर- श्री माऊली भजनी मंडळ (जळगाव), १३ सप्टेंबर- गजानन महाराज भजनी मंडळ (निमखेडी ता. जामनेर) यांचा भजन कार्यक्रम सकाळी सहा ते रात्री आठदरम्यान श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण, रात्री साडेआठ ते साडेनऊ उपासना. १५ सप्टेंबरला ऋषीपंचमी महाराजांचा पुण्यतिथी सोहळा. यादिवशी पहाटे पाच ते रात्री दहादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम होतील. यात सकाळी पाचला महाअभिषेक, सकाळी नऊला शृंगार आरती, दुपारी साडेबाराला महाआरती व महाप्रसाद वाटप. शिवकुमार डोंगरे व त्यांच्या पत्नी आशा डोंगरे, संस्थेचे अध्यक्ष श्री. केले व त्यांच्या पत्नी सुनंदा केले यांच्या हस्ते महाप्रसाद वाटप होईल. पुण्यतिथीच्या दिवशी श्री गजानन महिला भजनी मंडळ, श्री एकता भजनी मंडळ, श्री रेणुका भजनी मंडळ, श्री सखी भजनी मंडळ, श्री स्वानंदी भजनी मंडळ, गोपाळनगर, गुरुदत्त भजनी मंडळ, श्री शिवाई भजनी मंडळ, श्री तुळजाभवानी भजनी मंडळ यांचा भजन कार्यक्रम होईल. दरम्यान, अन्नदानात सहभागी होण्यासाठी भाविकांनी तेल, बाजरी, तांदूळ, साखर, चणाडाळ इत्यादी साहित्य किंवा रोख स्वरूपात मदत करू शकतात. या कार्यक्रमांत भाविकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मंदिर संस्थानतर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja First Look 2026 : ही शान कुणाची...! लालबागच्या राजाची पहिली झलक समोर; भव्य मंदिरसदृश प्रवेशद्वार अन् महाकाय त्रिशूळाची चर्चा, पाहा खास Photo

काय राव, सगळ्या DRSचं क्रेडिट तू घेतलंस! ईशान किशन किशनने वैभवला चिडवलं; १५ वर्षांच्या पठ्ठ्यानेही लगेच दिलं भन्नाट उत्तर, नेमकं काय घडलं?

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

Latest Marathi News Live Update : मविआचं सरकार पाडण्यासाठी ५ हजार कोटी खर्च, ठाकरेंच्या खासदाराचा गंभीर आरोप

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

SCROLL FOR NEXT