नाशिक

अभियांत्रिकीचे नाशिकमध्ये साडेदहा हजार प्रवेश

CD
अभियांत्रिकी प्रवेशात ‘संगणक’चीच चलती नाशिक राज्यात तिसरे; चौथ्या फेरीअखेर राज्यात १.५२ लाख प्रवेश सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ११ : अभियांत्रिकी पदवीच्या प्रथम वर्ष प्रवेशात यंदाही संगणक आणि त्याच्याशी संलग्न शाखांचा वरचष्मा कायम आहे. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या चौथ्या फेरीअखेर राज्यातील दोन लाख ३ हजार २९३ उपलब्ध जागांपैकी एक लाख ५२ हजार ४५२ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. यामध्ये जिल्ह्यातील १० हजार ५७० विद्यार्थ्यांचा समावेश असून, जिल्हानिहाय प्रवेशात नाशिकने राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या चार फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. चौथ्या फेरीअखेर उपलब्ध जागांपैकी ७४.९९ टक्के जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत. यंदा राज्यातील ३८० अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये १११ अभ्यासक्रमांसाठी एकूण दोन लाख १८ हजार ९७६ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी कॅप प्रक्रियेसाठी दोन लाख ३ हजार २९३ जागा ठेवण्यात आल्या होत्या. अभियांत्रिकी प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणीला २ जुलैपासून सुरुवात झाली होती. यंदा दोन लाख ४५ हजार ६४६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. चार फेऱ्यांनंतरही विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल संगणक अभियांत्रिकीसह तंत्रज्ञानाधारित शाखांकडे असल्याचे प्रवेशाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. विद्यापीठनिहाय विचार करता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये सर्वाधिक प्रवेश झाले आहेत. संस्थात्मक फेरीत ५० हजार ८४१ जागा नियमित कॅप फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर आता संस्थात्मक आणि व्यवस्थापन कोट्यातील प्रवेश सुरू आहेत. सर्व प्रवेश प्रक्रिया सोमवार (ता. १४) पर्यंत पूर्ण केली जाणार आहे. संस्थात्मक फेरीसाठी कॅपमधून शिल्लक राहिलेल्या राज्यभरातील ५० हजार ८४१ जागा उपलब्ध आहेत. तर व्यवस्थापन कोट्यात १५ हजार ६८३ जागा उपलब्ध आहेत. पुणे आघाडीवर; नागपूर दुसरे जिल्हानिहाय प्रवेशात ४१ हजार १२२ प्रवेशांसह पुणे जिल्हा आघाडीवर आहे. १५ हजार ४८७ प्रवेशांसह नागपूर दुसऱ्या, तर १० हजार ५७० प्रवेशांसह नाशिक तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर कोल्हापूरमध्ये ९ हजार ६६९ आणि मुंबई उपनगरात ९ हजार १२ विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी प्रवेश घेतला आहे. इन्‍फो राज्‍यस्‍तरावर शाखानिहाय झालेले प्रवेश... - कॉम्प्युटर इंजिनिअरिंग २३,२३० - मेकॅनिकल इंजिनिअरिंग- १६,९१८ - ई ॲण्ड टीसी- १५,९७१ - कॉम्प्युटर सायन्स अँड इंजि.- १५,७८७ - इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी- १२,४९४ - सिव्हील इंजिनिअरिंग १२,०९५ - इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग १०,१९२ - एआयडीसी- ८,८१६ - कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ५,४८० - आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग- ३,९३६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI व्यवहारांवर द्यावे लागणार शुल्क; नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचे संकेत, कारणही सांगितलं...

Karmad News : उघड्या लिफ्टमधून बियाण्याची पोती नेताना तरुणाचा मृत्यू; कंपनी मॅनेजर, एचआर अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा

Delhi Police IPS Transfers : दिल्ली पोलिस दलात मोठा फेरबदल; 5 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती? पाहा बदल्यांची यादी

Bogus Doctor Crime : वारजे, खराडीत बोगस डॉक्टरांवर कारवाई; मनपाच्या बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीची कारवाई

Latest Marathi News Live Update : परवानगी नाकारली तरी मुंबईत जाणारच; जरांगेंचा निर्धार

SCROLL FOR NEXT