नाशिक

धुळे टुडे १ संक्षीप्त

CD
धुळे ः टुडे १ साठी, संक्षीप्त --- सूचना ः टॉपच्या जाहिरातीजवळ बातमी लावल्यानंतर त्या खाली संक्षिप्त घ्यावे. --- खोपडेंच्या नियुक्तीबाबत महापौर परदेशी यांना पत्र धुळे : उच्च न्यायालयाचा आदेश, संख्याबळ या आधारावर राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेनाप्रणीत शहर विकास आघाडीचे नगरसेवक दीपक खोपडे यांची महापालिका विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करावी, अशी मागणी शहर विकास आघाडीने महापौर मायादेवी परदेशी यांना पत्र देऊन केली आहे. शहर विकास आघाडीचे गटनेते शाहबाज शाह यांनी महापौरांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या स्थापन शहर विकास आघाडी या गटाचा गटनेता असून, आमच्यातर्फे विभागीय आयुक्तांकडे १३ सदस्यांची नोदणी झाली आहे. महापालिका अधिनियमानुसार आमचा गट संख्येने मोठा आहे. तसेच उच्च न्यायालयाने संबंधित याचिकेवर ‘मेरीट''च्या आधारावर महापालिकेने लवकर विरोधी पक्षनेता निवडीबाबत निर्णय घेण्याचा आदेश दिला आहे. विभागीय आयुक्तांकडे आमच्या गटाच्या नोंदणीत आमचा गट मोठा असल्याने महापौरांनी गटाचे दीपक खोपडे यांची विरोधी पक्षनेता म्हणून नियुक्ती करावी. नगरसेवक धीरज कलंत्री, शिवसेना महानगरप्रमुख संजय वाल्हे, डॉ. सर्फराज अन्सारी, तुषार नवले आदी उपस्थित होते. --- नवीन स्मार्ट मीटर; अभियंत्यास मारहाण धुळे : नवीन स्मार्ट मीटर बसविण्यास विरोध करत महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्याला मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना धुळे शहरातील डोंगरे महाराज नगरात घडली आहे. याप्रकरणी आझादनगर पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरण कंपनीचे पारोळा रोड कक्षाचे सहायक अभियंता आकाश मनोजराव बावणे (वय २८, रा. प्रभातनगर, देवपूर, धुळे) हे ९ सप्टेंबरला दुपारी साडेतीनच्या सुमारास डोंगरे महाराज नगरात शासकीय कर्तव्यावर असताना नवीन स्मार्ट मीटर लावत होते. त्या वेळी दोघांनी नवीन स्मार्ट मीटर बसविण्यास विरोध केला. त्यांनी अभियंता बावणे यांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण करत त्यांना मारहाण केली. या घटनेनंतर सहायक अभियंता बावणे यांनी आझादनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा नोंद केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja First Look 2026 : ही शान कुणाची...! लालबागच्या राजाची पहिली झलक समोर; भव्य मंदिरसदृश प्रवेशद्वार अन् महाकाय त्रिशूळाची चर्चा, पाहा खास Photo

काय राव, सगळ्या DRSचं क्रेडिट तू घेतलंस! ईशान किशन किशनने वैभवला चिडवलं; १५ वर्षांच्या पठ्ठ्यानेही लगेच दिलं भन्नाट उत्तर, नेमकं काय घडलं?

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

Latest Marathi News Live Update : मविआचं सरकार पाडण्यासाठी ५ हजार कोटी खर्च, ठाकरेंच्या खासदाराचा गंभीर आरोप

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

SCROLL FOR NEXT