नाशिक

धुळे राज्याचे प्रवेशव्दार

CD
धुळे ः टुडे १ साठी, अँकर --- फोटो क्रमांक ः 29405....जयकुमार रावल --- धुळे हे ‘गेटवे टू महाराष्ट्र’; औद्योगिक रोडमॅप तयार पालकमंत्री जयकुमार रावल ः रावेर ‘एमआयडीसी‘ प्रस्तावाला मंजुरीची मागणी सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ११ ः येथील जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद २०२६ ही केवळ उद्योजकांची बैठक नसून, पुढील २५ ते ३० वर्षांचा धुळे जिल्ह्याचा औद्योगिक रोडमॅप निश्चित करणारी परिषद आहे. धुळे हे ‘गेटवे टू महाराष्ट्र’ असून, देशातील प्रमुख बाजारपेठांना जोडणारे हे भविष्यातील मोठे रेल्वे व लॉजिस्टिक हब बनेल, असा विश्वास राज्याचे पणन व राजशिष्टाचारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (ता. ११) आयोजित जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. पालकमंत्री रावल म्हणाले, की नाशिक, इंदूर, सुरत व अंकलेश्वर यांसारख्या शहरांपासून धुळे समदूर आहे. मुंबई-आग्रा, सुरत-नागपूर, धुळे-सोलापूर महामार्ग आणि मनमाड-इंदूर व धुळे-नरडाणा रेल्वे जोडणीमुळे जिल्ह्याचे लॉजिस्टिक महत्त्व वाढले आहे. तापी नदीमुळे मुबलक पाणी, शेतमाल अन् सौरऊर्जेची उपलब्धता आहे. अभियांत्रिकी, फार्मसी व वैद्यकीय संस्थांमुळे जिल्ह्यात कुशल मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून, ‘धुळे ही इंजिनिअर्सची खाण’ आहे. शिरपूर टेक्सटाइल हब, नरडाणा ग्रोथ सेंटर, संरक्षण व साक्री परिसरातील अन्नप्रक्रिया क्षेत्राला अधिक चालना देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सर्वांनी एकत्र यावे हजारो कोटींची गुंतवणूक आणणाऱ्या उद्योजकाला परवानग्या, जमीन मोजणी वा वीजजोडणीसाठी महिनोन्‌महिने थांबावे लागू नये. प्रशासकीय कामांत विलंब न होता ‘वन स्टॉप’ व्यवस्था प्रत्यक्षात उतरली पाहिजे, असे सांगत, सामंजस्य करार हे केवळ टाळ्यांसाठी नसून त्यातून प्रत्यक्ष उद्योग उभारी घेतात, असे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उद्योगमंत्री उदय सामंत जिल्ह्याच्या पाठीशी असून, सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासन व नागरिकांनी विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले. --- १४-१ चौकट उद्योग विभागाकडे मागणी आमदार अनुप अग्रवाल यांनी जिल्ह्यातील औद्योगिक प्रगती, शक्यता व अडचणींवर प्रकाश टाकला. रावेर एमआयडीसी प्रकल्पाच्या जमिनीचा प्रस्ताव उद्योग विभागाने तत्काळ मंजूर करावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी परिषदेत सादरीकरणाद्वारे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाचा आलेख मांडला. खानदेश औद्योगिक विकास परिषदेतर्फे भरत अग्रवाल यांनीही मनोगत व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI व्यवहारांवर द्यावे लागणार शुल्क; नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचे संकेत, कारणही सांगितलं...

Karmad News : उघड्या लिफ्टमधून बियाण्याची पोती नेताना तरुणाचा मृत्यू; कंपनी मॅनेजर, एचआर अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा

Delhi Police IPS Transfers : दिल्ली पोलिस दलात मोठा फेरबदल; 5 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती? पाहा बदल्यांची यादी

Bogus Doctor Crime : वारजे, खराडीत बोगस डॉक्टरांवर कारवाई; मनपाच्या बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीची कारवाई

Latest Marathi News Live Update : परवानगी नाकारली तरी मुंबईत जाणारच; जरांगेंचा निर्धार

SCROLL FOR NEXT