नाशिक

दारू कारखाना उध्वस्त

CD
धुळे ः टुडे १ साठी --- अफू भुगा, बनावट दारू कारखाना उद्‍ध्वस्त मोहाडी परिसरात पोलिसांकडून १७ लाखांचा मुद्देमाल जप्त सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ११ ः शहरातील मोहाडी उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील (कै.) संजयभाऊ नगरातील घरात अफूच्या बोंडाचा चुरा व भुगा साठवून ठेवण्यासह बनावट देशी दारू तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याचा प्रकार स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत उघडकीस आला. पथकाने छापा टाकत १६० किलोहून अधिक अफूच्या बोंडाचा भुगा व पावडर, बॉटलिंग मशिन, ग्राईंडर मशिन आणि बनावट देशी दारूचा साठा, असा एकूण १७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पथकाने (कै.) संजयभाऊ नगरातील प्लॉट क्रमांक ५८ येथे छापा टाकला. गावडे याच्या ताब्यातील घराच्या तळमजल्यासह वरील मजल्यावरून अफूच्या बोंडाचा भुगा व पावडर मिळून १६० किलोहून अधिक वजनाचा साठा आढळून आला. त्यासह कारवाईत एक लाख किमतीची स्टीलची इलेक्ट्रिक बॉटलिंग मशिन, ५० हजार किमतीचे इलेक्ट्रिक ग्राईंडर मशिन, एक हजार किमतीचा इलेक्ट्रिक वजनकाटा, तसेच टँगो पंच नावाच्या बनावट देशी दारूच्या १८० मिलीच्या ९६ सीलबंद बाटल्या जप्त झाल्या. असा अंमली पदार्थ बाळगून बेकायदेशीर विक्री केली जात असल्याचे तपासात समोर आले. याप्रकरणी हवालदार सचिन गोमसाळे यांच्या फिर्यादीनुसार मोहाडी पोलिस ठाण्यात हॉटेलचालक गंभीर माणिक गावडे (वय ५४, रा. मोहाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manchar Accident : दोन भीषण अपघातांत खेड तालुक्यातील दोघांचा व आंबेगाव तालुक्यातील एकाचा मृत्यू; एक गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : परवानगी नाकारली तरी मुंबईत जाणारच; जरांगेंचा निर्धार

आकाश पाळण्यात महिलेचे केसं अडकले, केसांसह चामडी निघाली; तांन्हा पोळ्याच्या यात्रेत थरारक घटना

Kaygaon News : गोदावरीत उडी घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या अल्पवयीन मुलाचे पोलिसांनी वाचवले प्राण

Sangli Mahanagarpalika Bharti : महापालिकेत भरतीचा मार्ग मोकळा; टाटा कन्सल्टन्सीला दिला कंत्राटाचा कार्यादेश, 82 रिक्त पदांपैकी 41 पदांसाठी भरती

SCROLL FOR NEXT