नाशिक

अल्पवयीन मुलीशी विवाह

CD
धुळे ः टुडे १ साठी, अँकर शेजारी --- अल्पवयीन मुलीशी विवाह; पतीसह सासरच्यांवर गुन्हा सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ११ ः अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही एका मुलीला पळवून नेऊन तिच्याशी विवाह करत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना धुळे तालुक्यातील चितोड येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात पतीसह त्याच्या आई-वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ५ जुलै २०२५ ते ४ ऑगस्ट २०२६ या कालावधीत संशयित सुमीत राजू मोरे (रा. चितोड, ता. धुळे) याने पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही तिला पळवून नेले. त्यानंतर वरखेडे (ता. धुळे) येथे मंदिरात तिच्याशी विवाह केला. लग्नानंतर पीडितेवर अत्याचार करण्यात आल्याने ती गरोदर राहिली. ५ ऑगस्टला रात्रीच्या सुमारास तिने एका बालिकेला जन्म दिला. वयाच्या पुराव्याची खात्री पटल्यानंतर ७ सप्टेंबरला पोलिस अधिकारी खालिदा सय्यद यांनी दिलेल्या जबाबानुसार पॉक्सोसह विविध कलमांन्वये गुन्हा नोंद झाला. याप्रकरणी पती सुमीत राजू मोरे, सासरा राजू भाईदास मोरे, सासू सुरेखा मोरे (सर्व रा. चितोड) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. पोलिस उपनिरीक्षक के. एन. सय्यद तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manchar Accident : दोन भीषण अपघातांत खेड तालुक्यातील दोघांचा व आंबेगाव तालुक्यातील एकाचा मृत्यू; एक गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : परवानगी नाकारली तरी मुंबईत जाणारच; जरांगेंचा निर्धार

आकाश पाळण्यात महिलेचे केसं अडकले, केसांसह चामडी निघाली; तांन्हा पोळ्याच्या यात्रेत थरारक घटना

Kaygaon News : गोदावरीत उडी घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या अल्पवयीन मुलाचे पोलिसांनी वाचवले प्राण

Sangli Mahanagarpalika Bharti : महापालिकेत भरतीचा मार्ग मोकळा; टाटा कन्सल्टन्सीला दिला कंत्राटाचा कार्यादेश, 82 रिक्त पदांपैकी 41 पदांसाठी भरती

SCROLL FOR NEXT