नाशिक

डॉक्टरला धमकीचा गुन्हा

CD
दवाखान्यात घुसून डॉक्टरला धमकी -- दोंडाईच स्टोन क्रशर भागीदारी नाकारल्याने प्रकार सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ११ ः स्टोन क्रशरच्या व्यवसायात भागीदार करून घेण्यास नकार दिल्याच्या रागातून दोघा संशयितांनी दवाखान्यात बेकायदेशीरपणे घुसून डॉक्टरला ठार मारण्याची धमकी दिली. ही धक्कादायक घटना दोंडाईचा (ता. शिंदखेडा) शहरातील रेल्वेस्थानक परिसरातील एका खासगी दवाखान्यात घडली. संशयितांनी डॉक्टरचा गळा दाबून रोकड, कागदपत्रे लंपास केली, तसेच तीन लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला असून, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. घनश्याम जयवंतराव पाटील (रा. अमळनेर) व भैरूलाल सुपडू पाटील (रा. नगाव, ता. धुळे) या दोघांनी डॉक्टरकडे आदिती स्टोन क्रशरच्या व्यवसायात भागीदार करून घेण्याचा तगादा लावला होता. मात्र, डॉक्टरने त्यास स्पष्ट नकार दिला. याच रागातून संशयितांनी दवाखान्यात अनाधिकाराने प्रवेश करत डॉक्टरला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली व गळा दाबून ठार मारण्याची धमकी दिली. या वेळी टेबलच्या ड्रॉव्हरमधील दीड लाखाची रोकड आणि आदिती स्टोन क्रशरचे मूळ रजिस्टर काढून घेतले. डॉक्टरच्या मुलाला ठार मारण्याची धमकी देऊन तीन लाख रुपयांची खंडणीही वसूल केली. दहशतीच्या या प्रकारादरम्यान मध्यस्थी करण्यास आलेल्या डॉक्टरच्या पत्नीचा संशयितांनी विनयभंग केला व त्यांच्या गळ्यातील २२ ग्रॅमची सोन्याची पोत ओरबाडून घेतली. तसेच पोलिसांत तक्रार दिल्यास खोट्या गुन्ह्यांत अडकविण्याची धमकीही दिली. या प्रकरणी डॉक्टरने दिलेल्या फिर्यादीवरून दोंडाईचा पोलिस ठाण्यात घनश्याम पाटील व भैरूलाल पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manchar Accident : दोन भीषण अपघातांत खेड तालुक्यातील दोघांचा व आंबेगाव तालुक्यातील एकाचा मृत्यू; एक गंभीर जखमी

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर....

आकाश पाळण्यात महिलेचे केसं अडकले, केसांसह चामडी निघाली; तांन्हा पोळ्याच्या यात्रेत थरारक घटना

Kaygaon News : गोदावरीत उडी घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या अल्पवयीन मुलाचे पोलिसांनी वाचवले प्राण

Sangli Mahanagarpalika Bharti : महापालिकेत भरतीचा मार्ग मोकळा; टाटा कन्सल्टन्सीला दिला कंत्राटाचा कार्यादेश, 82 रिक्त पदांपैकी 41 पदांसाठी भरती

SCROLL FOR NEXT