नाशिक

आज खुली मॅरेथॉन स्पर्धा

CD
धुळे ः टुडे १ साठी -- गरजेनुसार मॅरेथॉनचा फोटो क्लिपार्ट घ्यावा. शिरपूरमध्ये आज खुली मॅरेथॉन स्पर्धा सकाळ वृत्तसेवा शिरपूर, ता. ११ ः श्री विलेपार्ले केळवाणी मंडळ संचालित आमदार अमरिश आर. पटेल पोलिस ॲकॅडमी आणि अस्तित्व सोशल वेल्फेअर फाउंडेशनतर्फे माजी मंत्री तथा आमदार अमरिश पटेल यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त खुल्या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शनिवारी (ता. १२) सकाळी सहाला करवंद नाक्यावरील आर. सी. पटेल फार्मसी कॉलेज येथून सुरू होईल. एसव्हीकेएम संस्थेचे सहअध्यक्ष भूपेशभाई पटेल व उपाध्यक्ष चिंतनभाई पटेल यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम होत आहे. परिसरातील युवक-युवतींमध्ये क्रीडासंस्कृती आणि आरोग्याविषयी जागृती निर्माण करणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. महिला व पुरुष अशा दोन्ही गटांसाठी स्वतंत्र स्पर्धा होणार असून, प्रत्येकी प्रथम तीन विजेत्यांत प्रथम ३१ हजार, द्वितीय २१ हजार, तृतीय ११ हजाराचे रोख बक्षीस, करंडक व मेडल दिले जाईल. पंधराशे सहभागींना टी-शर्ट व मेडल देऊन सन्मानित केले जाणार आहे. पोलिस ॲकॅडमीच्या माध्यमातून शिस्त व शारीरिक क्षमतेला प्राधान्य दिले जाते. याच धर्तीवर, तरुणांना निरोगी जीवनशैलीकडे वळवण्यासाठी ही स्पर्धा महत्त्वाची ठरेल. शिरपूर शहर व परिसरातील धावपटूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन ॲकॅडमीचे प्रमुख निवृत्त पोलिस निरीक्षक अंसाराम आगरकर व आयोजकांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manchar Accident : दोन भीषण अपघातांत खेड तालुक्यातील दोघांचा व आंबेगाव तालुक्यातील एकाचा मृत्यू; एक गंभीर जखमी

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर....

आकाश पाळण्यात महिलेचे केसं अडकले, केसांसह चामडी निघाली; तांन्हा पोळ्याच्या यात्रेत थरारक घटना

Kaygaon News : गोदावरीत उडी घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या अल्पवयीन मुलाचे पोलिसांनी वाचवले प्राण

Sangli Mahanagarpalika Bharti : महापालिकेत भरतीचा मार्ग मोकळा; टाटा कन्सल्टन्सीला दिला कंत्राटाचा कार्यादेश, 82 रिक्त पदांपैकी 41 पदांसाठी भरती

SCROLL FOR NEXT