पत्ता विचारण्याच्या बहाण्याने
एकाची सोन्याची अंगठी लंपास
वाघनगरातील घटना; दोघांची हातचलाखी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ११ : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाला बोलण्यात गुंतवून त्यांच्या बोटातील सोन्याची अंगठी हातचलाखीने काढून घेत दोन संशयितांनी विना क्रमांकाच्या कारमधून पलायन केले. बुधवारी (ता. ९) सकाळी साडेसहाच्या सुमारास शहरातील वाघनगर रस्त्यावर ही घटना घडली. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
दिलीप बाबुराव सुरवाडे (वय ६६, रा. गुलमोहर हाउसिंग सोसायटी, गिरणा पंपिंग रोड) हे निवृत्त कर्मचारी आहेत. बुधवारी सकाळी ते वाघनगर रोडवरून पायी गुलमोहर कॉलनीकडे जात होते. जय भवानी कॅटरर्सच्या गोदामासमोर एक पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी कार येऊन थांबली. त्यातून दोन अनोळखी व्यक्ती खाली उतरले.
दोघांनी सुरवाडे यांच्याजवळ जाऊन ‘यहाँ भोलेनाथ का मंदिर कहाँ है?’ अशी विचारणा केली. पत्ता सांगत असताना भामट्यांनी त्यांना बोलण्यात गुंतविले. त्याचवेळी हातचलाखीने सुरवाडे यांच्या उजव्या हातातील बोटात असलेली सुमारे दहा ग्रॅम वजनाची, पुष्कराज खडा असलेली सोन्याची अंगठी काढून घेतली. त्यानंतर दोघेही कारमध्ये बसून पसार झाले.
घटनेनंतर सुरवाडे यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार दोन अनोळखींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक संजय शेलार करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.