नाशिक

पावसाच्या आगमनाने मूर्ती विक्रेत्यांची तारांबळ गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूर्ती झाकण्यासाठी धावपळ

CD
सेकंडमेन (दोन कॉलम फोटो येणार आहे) जळगाव : पावसात गणेश मूर्ती भिजू नये, यासाठी विक्रेत्यांची सुरू असलेली धावपळ. -------------- पावसामुळे मूर्तीविक्रेत्यांची तारांबळ -------- ग्राहकांचीही गैरसोय; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र धावपळ सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १२ : गणेशोत्सवाची लगबग सुरू असतानाच शहरात पावसाने अचानक हजेरी लावल्याने गणेशमूर्ती विक्रेत्यांची एकच तारांबळ उडालल्याचे चित्र पाहावयास मिळाले. शहरात विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या मूर्ती विक्री केंद्रांवर पावसाचे पाणी शिरू नये, शिवाय मूर्तींचे नुकसान होऊ नये, यासाठी विक्रेत्यांना तातडीने प्लास्टिक व ताडपत्रीचा आधार घ्यावा लागला. काही ठिकाणी मूर्ती सुरक्षित ठिकाणी हलविण्याचीही धावपळ सुरू होती. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपल्याने शहरातील विविध भागांत आकर्षक गणेशमूर्ती विक्रीसाठी दाखल झालेल्या आहेत. लहान-मोठ्या आकारातील व विविध आकर्षक रूपांतील मूर्ती ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. मात्र, अचानक सुरू झालेल्या पावसामुळे विक्रेत्यांची चिंता वाढली आहे. मातीच्या मूर्तींना पाणी लागल्यास रंग खराब होण्याबरोबरच मूर्तीच्या आकारावरही परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे विक्रेत्यांकडून विशेष काळजी घेतली जात आहे. ....... पावसामुळे धावपळ शहरातील काही मूर्ती विक्री केंद्रांवर पावसाच्या सरी सुरू होताच विक्रेत्यांनी मूर्तींवर ताडपत्री टाकली. काही ठिकाणी दुकानातील साहित्य हलविण्यासाठी मदतनीसांची धावपळ सुरू झाली. ग्राहक मूर्ती पाहण्यासाठी येत असतानाच पाऊस सुरू झाल्याने त्यांनाही काही काळ थांबावे लागले. ....... विक्रेत्यांकडून खबरदारी गणेशोत्सवासाठी मूर्ती खरेदी करण्यासाठी नागरिकांची बाजारात गर्दी वाढताना दिसून येत आहे. आगामी दिवसांत गणेश मूर्ती विक्रीला आणखीनच वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पावसाचा अंदाज लक्षात घेऊन मूर्तीविक्रेत्यांनी सुरक्षित व्यवस्था करणे आवश्यक झाले आहे. पावसामुळे मूर्तींचे नुकसान होऊ नये आणि ग्राहकांना खरेदीसाठी सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी विक्रेत्यांकडून खबरदारी घेतली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

Dr. Ratnakar Mahajan Pass Away: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. रत्नाकर महाजन यांचे निधन; महाराष्ट्रातील पुरोगामी, वैचारिक चळवळीतील अभ्यासू आवाज हरपला

Marathi News Live Updates: स्वच्छता साहित्यासाठी डीबीटी अशक्य, स्थायी समितीसमोर फेरप्रस्ताव

Karad Chain Snatching: रेकॉर्डवरील गुन्हेगारावर ‘जॅक’ पडला भारी; कऱ्हाडमध्ये उसातून शोधला सोनसाखळी चोर, श्वानाने काढला माग

SCROLL FOR NEXT