नाशिक

गणरायाच्या स्वागतासाठी बाजारपेठ फुलली

CD
मेनफिचर शहर टुडे पान दोनसाठी -------------- NSK26H29431 जळगाव : येथील बाजारपेठेत शनिवारी खरेदीसाठी झालेली गर्दी. ------------- NSK26H29432 गणेश मूर्ती खरेदी करताना महिला ------------ NSK26H29433 व NSK26H29434 सजावटीचे साहित्य खरेदी करताना भाविक. ---------------- गणरायाच्या स्वागतासाठी बाजारपेठ फुलली ------- व्यापाऱ्यांमध्ये उत्साह; सजावटीसह पूजेचे साहित्य खरेदीसाठी गर्दी सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १२ : श्री गणेशोत्सवाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने शहरातील बाजारपेठेत गणरायाच्या स्वागताची जोरात तयारी सुरू झालेली दिसून येत आहे. गणेशमूर्तींसह सजावटीचे साहित्य, पूजासाहित्य, फुलांच्या माळा, आकर्षक मखर व विद्युत रोषणाईच्या वस्तू खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठेत मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख बाजारपेठांत उत्सवाचे वातावरण निर्माण झालेले दिसून येत आहे. घरगुती गणपती व सार्वजनिक गणेश मंडळांकडून सजावटीसाठी विविध वस्तूंची खरेदी केली जात आहे. रंगीबेरंगी मखर, तोरणे, फुलांच्या माळा, कागदी सजावट, विविध आकारांच्या लाइटिंग माळा, पडदे व इतर आकर्षक सजावटीच्या साहित्याने बाजारपेठ सजली आहे. यंदा पर्यावरणपूरक सजावटीच्या वस्तूंनाही ग्राहकांकडून पसंती मिळत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. गणेश स्थापनेसाठी लागणारे पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठीही नागरिकांची लगबग सुरू आहे. नारळ, सुपारी, दुर्वा, फुले, अगरबत्ती, कापूर, हळद-कुंकू, वस्त्र व पुजेसाठी लागणाऱ्या अन्य साहित्याला मागणी वाढली आहे. सकाळच्या तुलनेत सायंकाळी बाजारपेठेत मोठी गर्दी होत असून, वाहतुकीवरही त्याचा परिणाम होत आहे. मोठी उलाढाल होण्याची अपेक्षा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत ग्राहकांची वाढती वर्दळ पाहून व्यापाऱ्यांमध्येही समाधानाचे वातावरण आहे. पुढील काही दिवसांत खरेदीला आणखी वेग येण्याची शक्यता असून, गणरायाच्या आगमनापूर्वी बाजारपेठेत मोठी उलाढाल होण्याची अपेक्षा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. गणरायाच्या स्वागतासाठी घराघरांत व गणेश मंडळांमध्ये तयारी अंतिम टप्प्यात आली असून, गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने जळगाव शहरातील वातावरण भक्तिमय होण्यास सुरुवात झालेली दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

14 Years Absconding Motorbike Thief Arrested in Partur : पाचोड पोलिसांची धडक कारवाई; १४ वर्षांपासून फरार असलेल्या मोटारसायकल चोराला परतूरमधून जेरबंद

Supreme Court: बँक खात्यातून पैसे गेल्यास भरपाई करुन देण्याची जबाबदारी बँकेची! सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

Latest Marathi News Update: डोळ्यात स्प्रे मारून ३० लाखांची रोकड लुटली

ABHISHEK SHARMA RECORD: अभिषेक शर्माच्या निशाण्यावर राहुल-हार्दिकचा विक्रम! चौथ्या T20 सामन्यात इतिहास घडवण्याची संधी

PCMC ACB raid on Chief Engineer : पिंपरी-चिंचवड महापालिकेत ACB ची मोठी कारवाई! थेट मुख्य अभियंत्यांच्या कार्यालयातच धाड; ठेकेदाराकडून लाच मागताना बड्या अधिकाऱ्याला बेड्या

SCROLL FOR NEXT