नाशिक

खो-खो स्पर्धेत डंका

CD
धुळे : टुडे पान २ साठी... -- फोटो क्रमांक : 29420 धुळे : गरुड मैदानावर झालेल्या तालुकास्तरीय खो - खो स्पर्धेत विजयी सैनिकी विद्यालयाचे संघ. -- सैनिकी विद्यालयाचा खो-खो स्पर्धेत डंका -- तालुकास्तरावर विजय मिळवत संघांची जिल्हास्तरावर झेप सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १२ : येथील गरुड मैदानावर नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय खो-खो क्रीडा स्पर्धेत मोराणे (ता. धुळे) येथील श्री छत्रपती शिवाजी सैनिकी विद्यालयाच्या १७ व १९ वर्षाखालील दोन्ही खो-खो संघांनी यश संपादन केले. अनेक दिग्गज संघांवर मात करत या दोन्ही संघाने आता जिल्हास्तरीय स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले आहे. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच विद्यालयाच्या खेळाडूंनी चपळता, उत्कृष्ट समन्वय आणि बचावात्मक तंत्राचे उत्तम प्रदर्शन घडवले. अंतिम सामन्यांपर्यंतच्या प्रत्येक फेरीत खेळाडूंनी प्रतिस्पर्धी संघांवर एकतर्फी वर्चस्व गाजवत विजयश्री खेचून आणली. १७ वर्षाखालील व १९ वर्षाखालील या दोन्ही गटांच्या संघाने मिळवलेल्या या डबल विजयामुळे शाळेचे नाव उंचावले आहे. आता हे दोन्ही संघ लवकरच होणाऱ्या जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत आपले कौशल्य दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. विद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब भदाणे, सचिव शालिनी भदाणे, प्राचार्य एस. बी. गरुड, उपप्राचार्य एन. जे. देवरे आणि पर्यवेक्षक बी. एच. मगर यांनी खेळाडूंचे कौतुक केले. क्रीडा प्रमुख एस. एस. देवरे, क्रीडाशिक्षक बी. एम. बाविस्कर, प्रशिक्षक प्रशांत वाडीले आदींनी मार्गर्शन खेळाडू विद्यार्थ्यांना झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

Dr. Ratnakar Mahajan Pass Away: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. रत्नाकर महाजन यांचे निधन; महाराष्ट्रातील पुरोगामी, वैचारिक चळवळीतील अभ्यासू आवाज हरपला

Marathi News Live Updates: स्वच्छता साहित्यासाठी डीबीटी अशक्य, स्थायी समितीसमोर फेरप्रस्ताव

Karad Chain Snatching: रेकॉर्डवरील गुन्हेगारावर ‘जॅक’ पडला भारी; कऱ्हाडमध्ये उसातून शोधला सोनसाखळी चोर, श्वानाने काढला माग

SCROLL FOR NEXT