नाशिक

शहर - जिल्ह्यात कडेकोट पोलीस फौजफाटा तैनात

CD
शहर - जिल्ह्यात कडेकोट फौजफाटा तैनात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची सतर्कता सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १२ : शहर-जिल्ह्यात सोमवारी  (ता. १४) लाडक्या गणरायाची घरोघरी प्रतिष्ठापना होणार आहे. यामुळे शहर- जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहर आणि ग्रामीण पोलिस दलाकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. गुन्हे शाखा व गोपनीय विभागाकडून सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी करडी नजर ठेवली जात आहे. यासाठी अतिरिक्त फौजफाटाही पाचारण करण्यात आलेला आहे. शहरात पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महिनाभरापासून बंदोबस्ताचे नियोजन केले होते. त्यानुसार, भद्रकाली ठाण्यात गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह शांतता समिती पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. याचप्रमाणे, नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. डी.एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातही पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. ग्रामीणचे अपर अधीक्षक विमला एम., तर मालेगावचे अपर अधीक्षक सूरज गुंजाळ यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात ‘एक गाव एक गणपती’ अभियानासाठी अधीक्षक स्वामी यांनी आवाहन केले आहे. .... शहरातील बंदोबस्त आयुक्त : १ पोलीस उपायुक्त : ४ सहायक आयुक्त : ७ पोलीस निरीक्षक : ४० सहायक/उपनिरीक्षक : १३० परिविक्षाधीन उपनिरीक्षक : ३७ अंमलदार : २२०० महिला अंमलदार : ३०० लोहमार्ग पोलीस अंमलदार : २५ पुरुष होमगार्ड : ११०० महिला होमगार्ड : २५० आरसीपी : २ तुकड्या एसआरपीएफ : १ तुकडी सीआरपीसी : १ तुकडी ..... बुलेटस्‌.... - गुन्हे शाखेच्या पथकांकडून साध्या वेशात गर्दीत गस्त - सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी करडी नजर - शहर-जिल्ह्यातील संवेदनशिल गाव-शहरांत अतिरिक्त बंदोबस्त - धार्मिक स्थळांबाहेर फिक्स पॉइंट - सराईत गुन्हेगार, टवाळखोरांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई ---कोट (फोटो वापरावा) शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये,  यासाठी पोलिसांसह प्रत्येक नागरिकाने दक्षता बाळगावी. मंडळांनीही नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. - किरणकुमार चव्हाण, पोलिस उपायुक्त, शहर गुन्हे शाखा.

BRICS: पाकची उडाली झोप! 'ब्रिक्स'च्या घोषणापत्रात दहशतवादावर सडकून टीका; पहलगाम हल्ल्याचा उल्लेख

बाळाच्या संगोपनासाठी घरात आली मंगल; पण नंतर बदललं सगळंच! ‘अडकित्ता’मध्ये नेमकं काय घडलं? वाचा रिव्ह्यू

Pune Road Inspection: गणेशोत्सवाच्या तोंडावर पुण्यात रस्ते दुरुस्तीचा बोजवारा; मिरवणूक मार्गांवर खड्डे, धोकादायक चेंबर अन् फुटपाथ

Palghar Bus Tragedy: शिवशाही बसच्या डिकीचे झाकण उघडताच शेतकरी सुभाष पागींचा जागीच मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Marathi News Live Updates: गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी पुणेकरांची बाजारपेठेत गर्दी

SCROLL FOR NEXT