नाशिक

जळगावात दीड लाखांचे मांस जप्त

CD
टुडे एकसाठी ------------- जळगावात दीड लाखाचे मांस जप्त -------- पोलिसांच्या कारवाईत मास्टर कॉलनीतून पाच संशयितांना अटक सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १२ : शहरातील मास्टर कॉलनी व कुरेशी मोहल्ला परिसरात बेकायदेशीरपणे गोवंश जनावरांची कत्तल विक्रीसाठी ठेवलेल्या अड्ड्यावर एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत सुमारे एक लाख ५३ हजार ६०० रुपयांचे ५७० किलो मांस व कत्तलीसाठी लागणारे साहित्य जप्त करीत पाच संशयितांना अटक करण्यात आली आहे. येथील मास्टर कॉलनी व कुरेशी मोहल्ला परिसरात बेकायदेशीर गोमांस बाळगून त्याची विक्री करीत असल्याची गुप्त माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने घटनास्थळी छापा टाकला. पथकाला विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले सुमारे ५७० किलो गोमांस व कत्तलीचे साहित्य आढळून आले. पोलिस नाईक विशाल सुभाष कोळी (वय ३५) यांच्या फिर्यादीवरून शुक्रवारी (ता.११) सायंकाळी ६.२३ला एमआयडीसी पोलिस ठाण्यात संशयित शेख शोएब फिरोज (वय २६, रा. अक्सानगर, मेहरुण, जळगाव), शेख ताबिश शेख आरिफ कुरेशी (२४, रा. मास्टर कॉलनी, मेहरुण), कलीम हनीफ कुरेशी (४३, रा. मास्टर कॉलनी, मेहरुण), शेख फैजान शेख मुख्तार (वय २५, रा. उमर मशिदीजवळ, जळगाव) आसिफ आरिफ कुरेशी (वय २८, रा. उमर मशिदीजवळ, जळगाव) या पाच संशयितांना घटनास्थळावरच रंगेहात पकडण्यात आले. यावेळी एक संशयित पळून जाण्यात यशस्वी झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. तपास पोलिस उपनिरीक्षक अशोक काळे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

Dr. Ratnakar Mahajan Pass Away: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. रत्नाकर महाजन यांचे निधन; महाराष्ट्रातील पुरोगामी, वैचारिक चळवळीतील अभ्यासू आवाज हरपला

Marathi News Live Updates: स्वच्छता साहित्यासाठी डीबीटी अशक्य, स्थायी समितीसमोर फेरप्रस्ताव

SCROLL FOR NEXT