नाशिक

उत्कृष्ट आरास स्पर्धेत श्री. महाराणा प्रताप युवक मंडळाला प्रथम पारितोषिक

CD
फोटो : NSK26H29426 नंदुरबार : अपर पोलिस अधिक्षक आशित कांबळे यांच्याहस्ते प्रथम क्रमांकाचे पारितोषीक स्वीकारताना श्री महाराणा प्रताप युवक मंडळाचे पदाधिकारी ------------------- उत्कृष्ट आरास स्पर्धा उत्साहात श्री. महाराणा प्रताप युवक मंडळाला प्रथम पारितोषिक सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. १२ : शहर पोलिस ठाण्यातर्फे आयोजित सन २०२५ या वर्षाती घेतलेल्या उत्कृष्ट आरास स्पर्धेत शहरातील श्री महाराणा प्रताप युवक मंडळाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. पालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात गणेशोत्सवासंदर्भात शांतता कमिटीची बैठक झाली. या वेळी मागील वर्षाच्या उत्कृष्ट आरास स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. यात श्री महाराणा प्रताप युवक मंडळाला प्रथम पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. अपर पोलिस अधीक्षक आशित कांबळे यांच्या हस्ते मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना ट्रॉफी देण्यात आली. राजपूत समाजाचे अध्यक्ष मोहिनीराज राजपूत, मागील वर्षाचे गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष पवन राजपूत, गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष गजेंद्रसिंग राजपूत, २०२५ वर्ष गणेशोत्सव समितीचे उपाध्यक्ष सुदर्शन राजपूत, सचिव सुधीर राजपूत, सदस्य राजेंद्र राजपूत व गणेश राजपूत यांनी हे पारितोषिक स्वीकारले. गेल्या वर्षी ‘शिव विवाह’ हा आकर्षक देखावा सादर करून त्यातून धार्मिक व आध्यात्मिक संदेश देण्यात आला होता. मंडळाकडून दरवर्षी गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत असतो. आकर्षक धार्मिक, पौराणिक, सामाजिक प्रबोधन करणारे देखावे सादर केले जातात. यंदा मंडळाकडून ‘वटसावित्री महिमा’ हा देखावा साकारण्यात येत असून, त्यातून धार्मिक व पौराणिक महत्त्व विशद होणार आहे. यंदाच्या गणेशोत्सवात मंडळाने आरास तयार करण्याचे काम सुरू केले असून, अंतिम टप्प्यात आहे. राजपूत समाजाचे अध्यक्ष मोहिनीराज राजपूत आहेत. यंदाचे गणेश मंडळ उत्सव समितीचे अध्यक्ष गजेंद्रसिंग राजपूत, कार्याध्यक्ष जितेंद्रसिंग राजपूत, उपाध्यक्ष कमलेश राजपूत, सचिव उपेंद्र राजपूत, खजिनदार सुधीरसिंग राजपूत यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते गणेशोत्सवाच्या तयारीत सहभागी झाले आहेत.

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

Dr. Ratnakar Mahajan Pass Away: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. रत्नाकर महाजन यांचे निधन; महाराष्ट्रातील पुरोगामी, वैचारिक चळवळीतील अभ्यासू आवाज हरपला

Marathi News Live Updates: स्वच्छता साहित्यासाठी डीबीटी अशक्य, स्थायी समितीसमोर फेरप्रस्ताव

SCROLL FOR NEXT