मेनफिचर
टुडे पान एकसाठी
---------------------
(समर्पक एआयचे छायाचित्र वापरावे)
---------------------------
जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट कायम
-------
नियोजनाची गरज; केवळ २५ दिवसांच्या पावसानेही खरीप हंगाम तरला
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.१२ : शहरासह जिल्ह्यात तब्बल २५ दिवसांनंतर पावसाचे पुन्हा दमदार आगमन झाले आहे. त्यामुळे कोमेजणाऱ्या खरीप हंगामातील शेतपिकांना काही प्रमाणात का होईना या पावसाने दिलासा मिळाला आहे. मात्र, जिल्ह्यावर पाणीटंचाइचे सावट अद्यापही कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे.
शहरासह जिल्ह्यात १७ ऑगस्टनंतर फक्त ढगाळ वातावरणासह तापमान वाढत होते. ऐनपावसाळ्यात या विषम वातावरणामुळे खरीप हंगामातील पिके कोमजून नष्ट होण्याच्या मार्गावर होती. हवामान अभ्यासक वा पर्जन्यअभ्यासकांचे सर्व अंदाज या यंदाच्या मान्सूनने मोडकळीत काढले होते. मात्र, काल बऱ्यापैकी पाउस झाल्याने खरिपाच्या पिकांना जीवनदान मिळाले असले तरी आगामी काळातील पाणीटंचाई कायम आहे.
जिल्ह्यात यंदा ‘एल निनो’च्या प्रभावामुळे मान्सून सरासरीपेक्षा कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तविला होता. त्यानुसार आतापर्यत जिल्ह्यात जून महिन्यात अवघे सात दिवस ६० ते ६८ टक्के, जुलै महिन्यातदेखील दहा-बारा दिवसांचा खंड घेत महिन्याच्या शेवटी जोरदार पर्जन्यवृष्टी करीत सरासरी १३५ टक्के पाऊस झाला आहे. मात्र, ऑगस्ट महिन्यातदेखील केवळ सहा दिवस कमीअधिक प्रमाणात पाऊस होऊन पुन्हा दीर्घ खंड घेतला होता.
सप्टेंबर महिन्यात ८३ टक्के तूट
सप्टेंबरच्या मध्यात शुक्रवारी(ता.११) सायंकाळनंतर जोरदार पावसाचे पुनरागमन झाले आहे. सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात १२३.६ मिलीमिटर पाऊस अपेक्षीत आहे. गेल्या २४ तासांत जळगाव शहरासह तालुका परिसरात सर्वांत जास्त ३६.२ मिलमिटर पाऊस झाला.
चाळीसगाव तालुक्यात पावसाने पाठ फिरवीत ०.७ मिलीमिटर पाऊस झाला.
यंदा जुलैअखेरीस झालेल्या दमदार अतिवृष्टीमुळे भोकरबारी व मन्याडवगळता बहुतांश प्रकल्प पूर्णक्षमतेने भरून ओसंडून प्रवाहित झाले होते. परंतु, पावसाचा खंड व प्रकल्पात होणारी पाण्याची आवक पाहता ३० ऑगस्टला गिरणा प्रकल्पासह अन्य प्रकल्पामधून होत असलेला विसर्ग बंद करण्यात आला होता. विषम हवामानामुळे बऱ्याचशा प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात थोड्याफार प्रमाणात घट झाली आहे. अजूनही भरपूर पावसाची अपेक्षा शेतकरी करीत आहेत.
--------
शुक्रवारी तालुकानिहाय झालेला पाऊस
तालुके--पाऊस (मि.मी.)--टक्के
जळगाव--३६.२--३६.९
भुसावळ--२०.६--२०.९
यावल--१६.४--१७.१
रावेर--१२.०--१४.९
मुक्ताईनगर--१९.४--१८.१
अमळनेर--२१.७--२०.०
चोपडा--१९.२--२०.४
एरंडोल--२१.४--२३.१
पारोळा --३.९--६.३
चाळीसगाव--०.७--९.०
जामनेर--२२.३--२१.३
पाचोरा--११.०--१५.८
भडगाव--४.८--१४.६
धरणगाव--१९.७--१४.५
बोदवड--२२.९--१६.२
-------
सिंचन प्रकल्पातील जलसाठा असा
प्रकल्प--टक्के
हतनूर--८१.३७
गिरणा--९९.१०
वाघूर--७३.७३
अभोरा---१००
मंगरूळ--१००
सुकी--१००
मोर--९२.७४
अग्नावती--१००
हिवरा--१००
बहुळा--९४.६९
तोंडापूर--६४.२३
अंजनी--९६.००
गुळ--७७.१४
भोकरबारी--४३.५८
बोरी-- ९८.३०
मन्याड--४७.३८
शेळगाव बॅरेज--२८.९५
एकूण--८०.२२
-----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.