नाशिक

रिसॉर्टवर गेलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यु

CD
रिसॉर्टवर गेलेल्या तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १२ : गंगापूर-गोवर्धन शिवारातील रिसॉर्टवर कुटुंबीयांसह सुटीचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या २७ वर्षीय तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. स्वीमिंग पूलमध्ये उडी मारण्यासाठी हा तरुण पत्र्यावर चढला असताना उच्च दाबाच्या वीजवाहिन्यांचा स्पर्श झाल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे कुटुंबीयांचा आनंदाचा क्षण दुःखात बदलला. तेजस संजय जगताप (वय २७, रा. गायकवाड कॉम्प्लेक्स, शिवाजीनगर, सातपूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. नाशिक तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापूर-गोवर्धन शिवारातील समृद्धी रिसॉर्ट गायकवाड कुटुंबीयांनी शुक्रवारी (ता. ११) बुक केले होते. रात्री कुटुंबीयांसह रिसॉर्टवर असताना मध्यरात्री बारा ते पहाटे तीनच्या दरम्यान तेजस स्वीमिंग पूलमध्ये उडी मारण्यासाठी शेजारील पत्र्यावर चढला. उडी मारण्याच्या तयारीत असतानाच पत्र्याजवळून जाणाऱ्या महावितरणच्या उच्च दाबाच्या वीजवाहिन्यांचा त्याला स्पर्श झाला. वीजवाहिनीचा स्पर्श होताच तेजसला जोरदार विजेचा धक्का बसला. त्यात तो गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाला. पहाटे तीनच्या सुमारास त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. गावित यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच नाशिक तालुका पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक मृदुला नाईक यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी नाशिक तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRICS: पाकची उडाली झोप! 'ब्रिक्स'च्या घोषणापत्रात दहशतवादावर सडकून टीका; पहलगाम हल्ल्याचा उल्लेख

बाळाच्या संगोपनासाठी घरात आली मंगल; पण नंतर बदललं सगळंच! ‘अडकित्ता’मध्ये नेमकं काय घडलं? वाचा रिव्ह्यू

Pune Road Inspection: गणेशोत्सवाच्या तोंडावर पुण्यात रस्ते दुरुस्तीचा बोजवारा; मिरवणूक मार्गांवर खड्डे, धोकादायक चेंबर अन् फुटपाथ

Palghar Bus Tragedy: शिवशाही बसच्या डिकीचे झाकण उघडताच शेतकरी सुभाष पागींचा जागीच मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Marathi News Live Updates: गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी पुणेकरांची बाजारपेठेत गर्दी

SCROLL FOR NEXT