नाशिक

शिक्षक समन्वय संघ

CD
धुळे : टुडे पान २ साठी... -- थकीत वेतनासह अनुदानाचे फरक देयक द्या -- जिल्हा शिक्षक समन्वय संघाची मागणी; वेतनासाठी वेधले लक्ष सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १२ : जिल्ह्यातील अंशतः अनुदानित १३ शाळांच्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे जानेवारी व फेब्रुवारी महिन्याचे थकीत वेतन अद्यापही मिळाले नाही. वाढीव वीस टक्के अनुदानाचे फरक देयक तसेच सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता तात्काळ देण्यात यावा, अशी मागणी जिल्हा शिक्षक समन्वय संघाने केली आहे. जिल्ह्यातील अंशतः अनुदानित ३३ शाळांपैकी २० शाळांचे जानेवारी आणि फेब्रुवारीचे नियमित वेतन अदा झाले होते. मात्र, उर्वरित १३ शाळांना ३१ मार्चनंतर निधी न मिळाल्यामुळे वेतन रखडले. या १३ शाळांच्या थकीत वेतनासाठी कपिल पाटील यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेत शिक्षण संचालक महेश पालकर यांनी निधी उपलब्ध करून वेतनाचा प्रश्न मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन दिले होते. या घटनेला चार महिने उलटले तरी स्थानिक पातळीवर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. जुलै महिन्यात शिक्षण उपसंचालक डॉ. एकनाथ आंबोकर यांनी राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी व वेतन अधीक्षकांना थकीत वेतन अदा करण्याचे पत्र देऊनही स्थानिक यंत्रणेने दुर्लक्ष केले आहे. तसेच, २५ ऑगस्ट २०२५ च्या शासन निर्णयानुसार वाढीव वीस टक्के अनुदानास पात्र असलेल्या शिक्षकांचे ऑगस्ट व सप्टेंबर २०२५ चे फरक देयक अद्याप मंजूर झालेले नाही. याशिवाय लेखाशिर्ष ३३६१ अंतर्गत सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. तुटपुंज्या पगारावर काम करणाऱ्या शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या या मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन सर्व देयके विनाअट आणि लवकरात लवकर वितरित करावीत, अशी मागणी जिल्हा शिक्षक समन्वय संघाने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

Dr. Ratnakar Mahajan Pass Away: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. रत्नाकर महाजन यांचे निधन; महाराष्ट्रातील पुरोगामी, वैचारिक चळवळीतील अभ्यासू आवाज हरपला

Marathi News Live Updates: गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी पुणेकरांची बाजारपेठेत गर्दी

Karad Chain Snatching: रेकॉर्डवरील गुन्हेगारावर ‘जॅक’ पडला भारी; कऱ्हाडमध्ये उसातून शोधला सोनसाखळी चोर, श्वानाने काढला माग

SCROLL FOR NEXT