फोटो : NSK26H29467
नंदुरबार : पर्यावरणपुरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेप्रसंगी उपस्थित अनिल चौधरी, गणेश पवार आदी.
------------------
शाडू मातीच्या गणेशमूर्ती
निर्मितीतून पर्यावरणाचा संदेश
नंदुरबार, ता. १२ : येथील सहकारमहर्षी श्री. अण्णासाहेब पी. के. पाटील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी, पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश जनमानसात पोहोचावा, या उद्देशाने शाडू मातीपासून पर्यावरणपूरक श्री गणेश मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा झाली.
कार्यशाळेत मुख्याध्यापक अनिल चौधरी, गणेश पवार यांनी पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्तीचे महत्त्व व फायदे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारे जलप्रदूषण टाळण्यासाठी शाडू मातीच्या मूर्तींचा वापर करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. कलाशिक्षक नितीन साळी यांनी विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून श्री गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने आकर्षक श्री गणेशमूर्ती साकारल्या. मूर्ती तयार करताना विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्याबरोबरच ‘पर्यावरण वाचवा, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा’ असा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमास सुरेंद्र पाटील, चेतना चौधरी, सुधाकर सूर्यवंशी, उज्वला चौरे, नितीन साळी अमोल भदाणे, विशाल चौधरी, हितेश चव्हाण, शिक्षकेतर कर्मचारी जितेंद्र चौधरी, रवींद्र चौधरी, सुधाकर ठाकूर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.