नाशिक

शैक्षणिक साहित्याचे वाटप

CD
धुळे : टुडे पान २ साठी... -- फोटो ४ कॉलमसाठी....फोटो क्रमांक : 29421 तिसगाव- ढंढाणे : ‘सकाळ’च्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपावेळी उपस्थित अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे. शेजारी शिक्षकांसह ग्रामस्थ. -- ध्येयातून यशाला गवसणी घाला! -- डॉ. अजय देवरे : ‘सकाळ’तर्फे शालेय साहित्याचे वाटप सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १२ : स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवून ध्येय निश्चितीतून वाटचाल करा. नियमित अभ्यास करा, मेहनत घ्या. ध्येयासक्तीतून वाटचाल केल्यास यश नक्की मिळते. त्यातून आपले गाव, कुटुंबाचे नाव उज्ज्वल करत देशाचे आदर्श नागरिक बना, असा कानमंत्र जिल्ह्याचे अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांनी विद्यार्थ्यांना दिला. - ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या धुळे विभागीय कार्यालयाचा वर्धापनदिन सोहळा नुकताच झाला. त्यात बुके, फुलहार देण्याऐवजी गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य द्यावे, असे आवाहन ‘सकाळ’ने केले होते. त्यास राजकीय, प्रशासकीय आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. यात संकलित शैक्षणिक साहित्य तिसगाव- ढंढाणे (ता. धुळे) येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील पहिली ते सातवीपर्यंतच्या गरजू विद्यार्थ्यांना अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या हस्ते शनिवारी (ता. १२) वाटप झाले. मुख्याध्यापिका मंगला पाटील, शिक्षिका वंदना मोरे, कल्पना पाटील, ज्येष्ठ शिक्षक देसले, अर्जुन न्याहळदे, निलेश देसले, ग्रामस्थ मच्छिंद्र पवार, सुरेश पाटील, राहुल पवार, ॲड. संदीप पाटील, योगेश पवार, अनिल अहिरे आदी उपस्थित होते. - विधायक उपक्रम विद्यार्थ्यांनी सुरेल गीताने मान्यवरांचे स्वागत केले. अपर पोलिस अधीक्षक डॉ. देवरे यांनी जिद्द, परिश्रम, चिकाटी, शिस्त आणि आत्मविश्‍वासातून प्रगती साधण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले. सव्वाशेवर विद्यार्थ्यांच्या हाती वह्या पेन, कंपास, सीसपेन्सिलसह अन्य शैक्षणिक साहित्य आणि मनात मोठी स्वप्ने देणारा हा विधायक उपक्रम शिक्षण आणि ग्रामीण मुलांना खऱ्या अर्थाने बळ देणारा ठरला. असे साहित्य मिळाल्यानंतर विद्यार्थी आनंदीत झाले. ‘सकाळ’च्या या विधायक उपक्रमाचे मान्यवरांसह उपस्थितांनी कौतुक केले. ‘सकाळ’चे ब्युरो चीफ निखिल सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. उपसंपादक धनंजय सोनवणे, वितरण व्यवस्थापक ज्ञानेश्वर चव्हाण, पत्रकार प्रदीप पाटील, गणेश माळी यांनी संयोजन केले. -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

MPSC Transparency issue: एमपीएससीच्या कारभारावर अपारदर्शकतेचे सावट; बैठकींचे इतिवृत्त व वार्षिक अहवाल लपविल्याने विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत

Legislative Estimate Committee: यवतमाळमध्ये अंदाज समितीच्या मागावर ‘खबऱ्यांचे नेटवर्क’? वाहनांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

Amravati Food Safety Action: अमरावतीत घाणेरड्या वातावरणात नूडल्स निर्मिती; कुत्रे-मांजरांचा वावर उघड, दोन गृहउद्योगांचे परवाने तातडीने निलंबित

Marathi News Live Updates: पाषाण-बावधन रस्त्यावर भरधाव कारची धडक, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

SCROLL FOR NEXT