ॲंकर
--------
शहर टुडे पान तीनसाठी
---------
NSK26H29471
जळगाव : विवेकानंद प्रतिष्ठान संगीत विद्यालयातील ‘संगीत के प्रणेता’ या संगीत सोहळ्यात शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीतावर आधारित गायन करताना विद्यार्थी.
-------------
‘संगीत के प्रणेता’ने रसिक श्रोते मंत्रमुग्ध
--
उपस्थितांची दाद; विवेकानंद प्रतिष्ठान संगीत विद्यालयात रंगला सोहळा
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १३ : येथील विवेकानंद प्रतिष्ठान संगीत विद्यालयाच्या वतीने पंडित विष्णू दिगंबर पलूस्कर व पं. विष्णू नारायण भातखंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित दहाव्या ‘संगीत के प्रणेता’ या दोनदिवसीय संगीत समारंभाला जळगावकर रसिकश्रोत्यांची भरभरून दाद मिळाली. संगीत विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या सोहळ्यात शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन, वादन व नृत्याच्या सादरीकरणाने उपस्थित मंत्रमुग्ध झाले.
अभिजात भारतीय संगीत जनमानसात रुजविण्यासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या विष्णूद्वयींना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यासाठी विवेकानंद प्रतिष्ठानच्या विविध शाळांसह जिल्हाभरातील संगीत साधकांनी स्वरसुमनांजली अर्पण केली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते पंडित भातखंडे व पंडित पलूस्कर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. विवेकानंद प्रतिष्ठानचे सांस्कृतिक विभाग प्रमुख किरण सोहळे यांनी समारोहाची संकल्पना व नियोजन केले.
विविध कलाविष्कार सादर
पहिल्या दिवशी रंजना बाभुळके, तर दुसऱ्या दिवशी भूषण गुरव यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व संगीत शिक्षकांनी ‘संगीत के प्रणेता, शत-शत तुम्हे प्रणाम’ या गीतातून विष्णुद्वयींना स्वरभावांजली अर्पण केली. पहिल्या दिवशी विवेकानंद प्रतिष्ठानच्या सेमी इंग्लिश व इंग्लिश मीडियम विभागातील विद्यार्थ्यांसह मयूर शहा, जितेश मराठे, तेजस मराठे, नुपूर खटावकर, राहुल कासार, नुपूर चांदोरकर, शिवानी पाठक व रुचिता कुलकर्णी यांच्या विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कार सादर केले.
या समारंभात दुसऱ्या दिवशी अक्षय गजभिये, स्वरा पाठक, सारंग जेऊरकर, योगेश पाटील, शिरीष जोशी, रमा करजगावकर, लक्ष्मण राजपूत, शानभाग विद्यालय, देवेंद्र गुरव, काशिनाथ पलोड स्कूल व डॉ. अपर्णा भट यांच्या विद्यार्थ्यांनी एकाहून एक सरस सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळविली. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र नन्नवरे, उपाध्यक्ष हेमा अमळकर, सचिव विनोद पाटील, सदस्य कविता दीक्षित, वैजयंती पाध्ये, वैशाली गोरे, दिनेश ठाकरे यांच्यासह रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुयोग गुरव व उमेश सूर्यवंशी यांनी आभार मानले. दर्शन गुजराती व कल्याणी वाणी यांनी सूत्रसंचालन केले. समारोहाच्या यशस्वितेसाठी रवींद्र भोईटे, शीतल सोनवणे, वर्षा कुलकर्णी, गणेश देसले, विवेक जोशी यांच्यासह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.