एसटी वर्कशॉपसमोरील
जुगारअड्ड्यावर छापा
--
आठ जुगाऱ्यांना अटक; सव्वालाखाचा ऐवज जप्त
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १२ : शहरातील शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एस. टी. वर्कशॉपसमोरील एका पत्र्याच्या शेडच्या आडोशाने सुरू असलेल्या जुगारअड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना रंगेहाथ पकडले. या कारवाईत एक लाख १२ हजार ३१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुरुवारी (ता.१०) रात्री साडेअकराच्या सुमारास परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक सह्याद्री बिर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व शनिपेठ पोलिसांच्या संयुक्त पथकाने हा छापा टाकला.
या कारवाईत पोलिसांना पाहून काहींनी मिळेल त्या रस्त्याने धूम ठोकली. मात्र, आठ जुगाऱ्यांना घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले. यात ३७ हजार ४० रुपये रोख, चार दुचाकी, जुगाराचे साहित्य असा एक लाख १२ हजार ३१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात ताब्यात घेतलेल्यांत जगदीश हरीनाथ शर्मा (वय ३२, रा. रामेश्वर कॉलनी, मेहरुण), संजय सुरेश महाजन (३७, रा. बदाम गल्ली, जुने जळगाव), हरीश विलास चौधरी (३४, रा. सुधाकरनगर), रोशन गोविंदा ढापणे (३६, रा. जुना असोदा रोड, बजरंग कॉलनी), जितेंद्र भानुदास सोनार (३४, रा. कालिंका माता, दशरथनगर), खगेंद्र रमेश कोल्हे (४६, रा. सुयोग कॉलनी), चेतन ज्ञानदेव महाजन (३५, रा. नेरीनाका, तुकाराम वाडीजवळ), राजेंद्र शिवाजी पाटील (३६, रा. श्रीकृष्णनगर, गोपाळपुरा) यांचा समावेश आहे. पोलिस नाईक रवींद्र वसंत साबळे यांच्या तक्रारीवरून जुगार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक संतोष खेडकर तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.