फोटो : NSK26H29596
नंदुरबार : कॉमर्स रील स्टार स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना प्राचार्य प्रा. डॉ. एम. जे. रघुवंशी. शेजारी समन्वयक डॉ. एम. एस. रघुवंशी, उपप्राचार्य डॉ. एम. आर. पाटील, उपप्राचार्य डॉ. एस. पी. पाटील आदी.
-----------------
पारंपरिक शिक्षणाबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानावर भर द्यावा
संतोष नानकाणी यांचे आवाहन; कॉमर्स रील स्टार स्पर्धा उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. १५ : विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणाबरोबरच आधुनिक तंत्रज्ञान, सर्जनशीलता व कौशल्य विकासावर भर देण्याचे आवाहन सी. ए. संतोष नानकाणी यांनी केले.
येथील जी. टी. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वाणिज्य मंडळाचे उद्घाटन व कॉमर्स रील स्टार स्पर्धा झाली. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा. डॉ. एम. जे. रघुवंशी होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे समन्वयक डॉ. एम. एस. रघुवंशी, उपप्राचार्य डॉ. एम. आर. पाटील, उपप्राचार्य डॉ. एस. पी. पाटील उपस्थित होते.
डॉ. स्वप्नील मिश्रा यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य प्रा. डॉ. एम. जे. रघुवंशी यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी वाणिज्य विषयाशी संबंधित विविध संकल्पना, व्यावसायिक कौशल्ये, जनजागृतीपर संदेश व सर्जनशील विचार रीलच्या माध्यमातून प्रभावीपणे सादर केले. स्पर्धा पदवीस्तरीय तसेच पदव्युत्तरस्तरीय अशा दोन गटात घेण्यात आली. पदवी गटातून प्रथम पारितोषिक अंकिता बंजारा या विद्यार्थिनीला देण्यात आले. द्वितीय पारितोषिक राजेश्वरी राजभोज, तृतीय पारितोषिक दिव्यानी मराठे, उत्तेजनार्थ पारितोषिक प्रविणा चौधरी या विद्यार्थिनींना प्रदान करण्यात आले. पदव्युत्तर गटातून प्रथम पारितोषिक आदर्श संगपाळ, द्वितीय पारितोषिक हितेश अहिरे, तृतीय पारितोषिक अंशुदेवी दुबे या विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण लेफ्टनंट डॉ. विजय चौधरी व डॉ. मनोहर बी. पाटील यांनी केले. विजेत्यांना बक्षीस स्वरूपात स्मृतिचिन्हे व प्रमाणपत्रे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून गौरविण्यात आले.
प्रा. विजय गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. नेहा पाटील, प्रा. पूजा ठाकरे, डॉ. गायत्री रघुवंशी, प्रा. शैलेश परदेशी, प्रा. डी. डी. गावित, प्रा. दारासिंग वळवी, प्रा. अमोल पाटील, प्रा. संग्राम पाडवी यांनी परिश्रम घेतले. प्रा. पिनल परदेशी यांनी आभार मानले.