नाशिक

महानिर्मितीचा सौर प्रकल्प कार्यान्वित

CD
फोटो - NSK26H29486 उदापूर (नागपूर) :महानिर्मितीचा सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला, त्याप्रसंगी व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी., विलास मोटघरे, संजय कुऱ्हाडे, अभय हरणे, मनेष वाघिरकर, राजेश पाटील, विजय राठोड आदी. महानिर्मितीचा सौर प्रकल्प कार्यान्वित सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १२ : महानिर्मितीने उभारलेल्या उदापूर (नागपूर) येथील १०० मेगावॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते हा प्रकल्प पहिल्यांदा ग्रीडशी जोडण्यात आला. त्यामुळे महावितरणला पुरेशी हरित ऊर्जा उपलब्ध होणार आहे. राज्याची हरित ऊर्जा निर्मिती क्षमता वाढवण्यासाठी महानिर्मितीने ४१० एकरांवर उभारलेल्या या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज १३ किमी लांबीच्या डबल सर्किट वाहिनीद्वारे वरूड-कळमेश्वर २२० केव्ही वाहिनीला जोडण्यात आली आहे. राज्याच्या २०३० पर्यंत ५२ टक्के ऊर्जा अपारंपरिक स्रोतांतून घेण्याच्या उद्दिष्टाला अनुरूप महानिर्मितीने व्हिजन २०३५ आखले आहे. त्याअंतर्गत ३२ गिगावॉटहून अधिक स्थापित क्षमतेचे लक्ष्य असून, २०३० पर्यंत आठ गिगावॉट आणि २०३५ पर्यंत १२ गिगावॉट सौर प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पामुळे महानिर्मितीची सौरऊर्जा निर्मितीची स्थापित क्षमता १.४ गिगावॉटहून अधिक झाली आहे. या प्रसंगी संचालक (प्रकल्प) राजेश पाटील, कार्यकारी संचालक (प्रकल्प)विवेक रोकडे, कार्यकारी संचालक (सौर, न.ऊ.प्र) गिरीश कुमारवार, कार्यकारी संचालक (संचलन) विलास मोटघरे तसेच मुख्य अभियंता (महापारेषण) सतीश अणे यांची विशेष उपस्थिती लाभली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

MPSC Transparency issue: एमपीएससीच्या कारभारावर अपारदर्शकतेचे सावट; बैठकींचे इतिवृत्त व वार्षिक अहवाल लपविल्याने विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत

Legislative Estimate Committee: यवतमाळमध्ये अंदाज समितीच्या मागावर ‘खबऱ्यांचे नेटवर्क’? वाहनांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

SCROLL FOR NEXT