धुळे : टुडे पान २ साठी...
---
फोटो क्रमांक : 29492
धुळे : संत सेना महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त काढण्यात आलेल्या पालखी मिरवणुकीत सहभागी झालेले समाजबांधव.
---
संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त महाआरती
पालखी मिरवणुकीत महिला, युवकांचा सहभाग; समाजभूषणांचा सन्मान
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १३ : शहर नाभिक समाजातर्फे संत शिरोमणी सेना महाराजांचा पुण्यतिथी सोहळा साजरा झाला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील केशव गार्डन येथून पालखी मिरवणुकीस प्रारंभ झाला. विशाल चित्ते व नंदू सोनवणे यांनी सपत्नीक पालखीचे, तर गणेश ठकरे व मनोज ठकरे यांनी प्रतिमेचे पूजन केले. या वेळी केशव गार्डनचे संचालक प्रकाश अग्रवाल यांचा सत्कार करण्यात आला.
केशव गार्डन, आग्रा रोड, पाचकंदील, महात्मा गांधी पुतळा, मोठा पूल, एकविरादेवी मंदिरमार्गे कानूश्री मंगल कार्यालयापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत महिला व युवकांनी पारंपरिक नृत्य सादर केले. कानूश्री मंगल कार्यालयात विलास सैंदाणे, सुभाष शिरसाठ, युवराज वारूळे, राजेश महाले व बापूजी अहिरे यांच्या उपस्थितीत मुख्य कार्यक्रम झाला. नरेंद्र खोंडे, अभियंता शशिशेखर अहिरे, गोरख सैंदाणे, प्रा. दीपक चित्ते, प्रा. जितेंद्र पगारे, डॉ. प्रफुल्ल फुलपगारे, भटू सूर्यवंशी, अतुल चित्ते, संजय अहिरराव, भय्या ठकरे, विलास देवरे, पराग बोरसे, डॉ. रामचंद्र चित्ते व हेमंत जाधव यांनी सपत्नीक महाआरती केली.
कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाजभूषणांचा सन्मान करण्यात आला. प्रकाश जाधव यांच्या भजनी मंडळाने सादर केलेल्या भजनांनी कार्यक्रमात रंगत आणली. संजय अहिरराव, नंदू सोनवणे, अमृत महाले, सुनील सैंदाणे, शरद सैंदाणे, प्रवीण सैंदाणे, विशाल चित्ते, दिनेश महाले, भीमराव वारुळे, छोटू सोनवणे, नाना वादळे, मनोज ठकरे, दत्तात्रय सैंदाणे, राहुल सूर्यवंशी, भटू सूर्यवंशी, पप्पू येशी, पप्पू ठकरे, धनराज पगारे आदींनी संयोजन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.