नाशिक

आविष्कार स्पर्धेचे आयोजन

CD
टुडे पान चारसाठी (शहर-जिल्हा कॉमन घ्यावी) NSK26H29494 जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आविष्‍कार स्‍पर्धेच्या पोस्‍टरचे प्रकाशन करताना कुलगुरु प्रा. विजय माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, ‘आविष्कार’च्या समन्वयक प्रा. डॉ. सुरेखा पालवे, राजेंद्र नन्नवरे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील आदी. ---------------- ‘आविष्‍कार’ स्‍पर्धेच्‍या पोस्‍टरचे प्रकाशन सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १३ : विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला, संशोधनवृत्तीला व नवकल्पनांना मंच उपलब्ध करून देणारी बहुप्रतिक्षित ‘आविष्कार’ स्पर्धा यंदादेखील होत आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने धुळे, जळगाव व नंदुरबार या तीनही जिल्ह्यांत जिल्हास्तरीय व विद्यापीठ परिसरात स्वतंत्र आविष्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्‍पर्धेच्‍या पोस्‍टरचे प्रकाशन नुकतेच झाले. जिल्‍हास्‍तरीय व विद्यापीठ परिसरात आयोजित स्पर्धेच्या पोस्टरचे प्रकाशन कुलगुरू प्रा. विजय माहेश्वरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेंद्र नन्नवरे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, ‘आविष्कार’च्या समन्वयक प्रा. सुरेखा पालवे, विद्यार्थी विकास अधिकारी, अधिसभा सदस्य अमोल मराठे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. प्रवीण महाले, ‘आविष्कार’च्या सहसमन्वयक प्रा. अमरदीप पाटील उपस्थित होते. जळगाव जिल्ह्याची जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धा आठ ऑक्टोबरला मुक्ताईनगर येथील श्रीमती जी. जी. खडसे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात होणार आहे. धुळे जिल्ह्याची जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धा पाच ऑक्टोबरला शिरपूर येथील एस. पी. डी. एम. महाविद्यालयात व नंदुरबार जिल्ह्याची जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धा पाच ऑक्टोबरला नवापूर येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात होईल. त्यानंतर नऊ ऑक्टोबरला विद्यापीठ परिसरात विद्यापीठस्तरीय आविष्कार स्पर्धा होईल. आविष्कार स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची सहभाग नोंदणी ११ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. २५ सप्टेंबरपर्यंत नोंदणीची अंतिम तारीख आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी निर्धारित कालावधीत नोंदणी करून या ज्ञान व संशोधनाच्या पर्वात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Balochistan Blast : बलुचिस्तानात पाकिस्तानी सुरक्षा दलाच्या ताफ्यावर मोठा हल्ला; २३ जवानांचा मृत्यू , BLAचा हात असल्याचा संशय

राष्ट्रपतींच्या ADCला करता येत नाही लग्न, काय असतात अटी? कशी होते निवड? १ जागा, ३० जण शॉर्टलिस्ट, १४ दिवसांची मॅरेथॉन मुलाखत

Marathi News Live Updates : अरविंद केजरीवाल यांची 'गोवा फॉरवर्ड पार्टी' आणि 'आम आदमी पार्टी' च्या युतीची घोषणा

भांडुपमध्ये पोलिसांची मोठी कारवाई! २० लाखांचा गुटखा पानमसाला जप्त, नऊ आरोपींना अटक; पाच वाहने जप्त

Indian Railway: तिकीट बुक न झालेल्यांसाठी गुडन्यूज! कोकणात 4 अनारक्षित रेल्वे सोडण्याचा निर्णय, मध्य रेल्वेची घोषणा

SCROLL FOR NEXT