पान २
-----
त्र्यंबकमधील स्मारकांच्या कामांना साडेतीन महिन्यांची मुदत
---
पाऊस, श्रावणामुळे उशीर ः कुंभमेळा प्राधिकरणाकडून असंरक्षित स्मारकांचे संवर्धन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १३ : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरमधील असंरक्षित स्मारकांची दुरुस्ती, कुंडांची स्वच्छता व जुन्या मंदिरांचे संवर्धन केले जात आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने प्रशासकीय मान्यता दिलेल्या आठ स्मारकांच्या कामांना येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याची मुदत दिली.
-----------
कुंभमेळ्याचे ध्वजारोहण अवघ्या दीड महिन्यावर आल्याने आता सिंहस्थाच्या कामांनी प्रचंड गती घेतली आहे. त्र्यंबकेश्वर शहर व परिसरात सुमारे एक हजार ४०० कोटींची कामे सुरू आहेत. यात नाशिक ते त्र्यंबकेश्वर या रस्त्यासाठी ३५० कोटी रुपये खर्च होतील. त्र्यंबकेश्वर परिसरातील विकेंद्रीत पाणीसाठा पूर्णपणे भरण्यासाठी गौतमी गोदावरी धरण ते त्र्यंबकेश्वर उपसा प्रणाली योजनेच्या माध्यमातून गोदावरी नदी बारमाही प्रवाही ठेवण्याचे नियोजन आहे. जलसंपदा विभागाच्या माध्यमातून या योजनेवर ३२८ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. कुशावर्त तीर्थाला पर्याय म्हणून पेगलवाडी येथे नवीन घाटांची उभारणी करण्यात येते. मंदिराचा परिसर अतिक्रमणमुक्त करून या ठिकाणी दर्शनपथ टप्पा एक व दोन अंतर्गत भाविकांसाठी सुविधा उभारल्या जातील. याबरोबरच गौतमेश्वर मंदिर दुरुस्तीचे काम, तलाव स्वच्छता, संगमतीर्थ, जुना कुशावर्त, इंद्रकुंड, बिल्वतीर्थ, मुकुंदेश्वर मंदिर व तलाव, प्रयागतीर्थ या असंरक्षित स्मारकांची कामे प्रगतिपथावर आहेत.
राज्य पुरातत्त्व विभागामार्फत होत असलेल्या आठ स्मारकांच्या कामासाठी ३१.९७ कोटींचा निधी ३ ऑक्टोबर २०२५ ला मंजूर केला आहे. ही कामे डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याची मुदत होती. त्या अनुषंगाने कामांना अपेक्षित गती दिली जात असली, तरी श्रावणात भाविकांची होणारी गर्दी, पावसाळा यामुळे ही कामे अपूर्ण राहिली होती. आता त्यांना गती दिली जाणार असून, येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यासाठी पालिका प्रशासनाचे प्रयत्न आहेत.
...
२०-२ चौकट
कामे व त्यासाठी निधी (कोटी रुपये)
- गौतमेश्वर मंदिर दुरुस्ती : ०.५०
- गौतमेश्वर तलाव स्वच्छता : १
- संगमतीर्थ, जुना कुशावर्त व कुंड स्वच्छता : ०.५०
- इंद्रकुंड : ३
- बिल्वतीर्थ : १०.९९
- मुकुंदेश्वर मंदिर व तलाव : ५.७३
- प्रयागतीर्थ : १०
- चोखोबा महाराज मंदिर : ०.२५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.