नाशिक

मातीच्यामातीच्या बाप्पांची आरास बाप्पांची आरास

CD
NSK26H29500 कानळदा (ता.जळगाव) : जिल्हा परिषदेच्या शााळेत शाडूमातीपासून गणपती बनविताना विद्यार्थी. ------- शाळेच्या पटांगणात साकारली शाडूमातीपासून श्रीगणेश मूर्ती -- कानळदा जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचा सहभाग सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १३ : शाळेच्या पटांगणात ना दप्तरांचा भार, ना नेहमीचा वर्ग. हातात होती शाडूची माती अन् मनात होता आपल्या हाताने गणेशमूर्ती साकारण्याचा आनंद! मातीच्या गोळ्याला आकार देत विद्यार्थ्यांनी गणरायाचे सुंदर रूप साकारले व त्यातून पर्यावरण संवर्धनाचा हृदयस्पर्शी संदेश दिला. हे चित्र होतं तालुक्यातील कानळदा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील अन् निमित्त होतं ‘आनंददायी शनिवार’उपक्रमांतर्गत शाडूच्या मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याच्या स्पर्धेचं. दप्तराविना भरलेल्या या शाळेत विद्यार्थ्यांनी शाळेच्या पटांगणात बसून मोठ्या उत्साहाने गणेशमूर्ती तयार केल्या. यावेळी कानळदाचे सरपंच पुंडलिक सपकाळे यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्त्व समजावून सांगितले. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींमुळे जलप्रदूषणासह पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम त्यांनी विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून दिले. शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याचे महत्त्व सांगतानाच त्यांनी स्वतः शाडू मातीपासून गणपती बनविण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. सर्व शिक्षक-शिक्षिकांनी विद्यार्थ्यांकडून गणेशमूर्ती तयार करून घेतल्या. विद्यार्थ्यांनी कल्पकतेचा सुंदर आविष्कार घडवीत एकापेक्षा एक आकर्षक गणेशमूर्ती साकारल्या. आपल्या हाताने घडविलेली मूर्ती पाहताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद व समाधान हे या उपक्रमाचे खरे वैशिष्ट्य ठरले. या उपक्रमाला जळगाव जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करून त्यांनी स्वतःच्या वतीने रोख बक्षिसे देत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. निवृत्त ग्रेडेड मुख्याध्यापक मुरलीधर सपकाळे यांनी विद्यार्थ्यांना सणोत्सव साजरे करताना पर्यावरणाची हानी होणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे, असे सांगितले. मुख्याध्यापक भास्कर टोके, शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी व पालक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Social Media Election Rules : निवडणूक प्रचारात डीपफेक व्हिडिओ वापराल तर कारवाई; आयोगाचे राजकीय पक्षांना कडक निर्देश

Central Railway: मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली! कसाऱ्याकडे जाणाऱ्या लोकल ठप्प, ४५ मिनिटं प्रवाशांचा खोळंबा

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Chanakya Niti: नशीब बदलत नाही म्हणून निराश आहात? चाणक्य नीतीतील ‘या’ २ सवयी आजपासून अंगीकारा!

Marathi News Live Updates : अरविंद केजरीवाल यांची 'गोवा फॉरवर्ड पार्टी' आणि 'आम आदमी पार्टी' च्या युतीची घोषणा

SCROLL FOR NEXT