नाशिक

चंदू अण्णा नगर-खोटेनगर रस्ता दुरुस्त करा; प्रभाग ९ मधील नागरिकांची पालकमंत्र्यांकडे साकडे

CD
शहर पान चारसाठी NSK26H29520 जळगाव : चंदूअण्णानगर-खोटेनगर रस्ता दुरुस्तीबाबत नवलसिंग पाटील यांना निवेदन देताना प्रा. डॉ. संदिप पाटील व परिसरातील नागरिक. ----------------- चंदू अण्णानगर-खोटेनगर रस्ता त्वरित दुरुस्त करा ---- प्रभाग नऊमधील नागरिकांची पालकमंत्र्यांकडे मागणी सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १५ : शहरातील प्रभाग क्रमांक नऊमधील चंदूअण्णानगर ते खोटेनगर या रस्‍त्‍याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. म्हणून या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे. स्थानिक रहिवासी प्रा. डॉ. संदिप पाटील यांच्‍यासह काही नागरिकांनी याबाबतचे निवेदन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना नुकतेच दिले. पालकमंत्र्यांचे स्वीय सहायक नवलसिंग पाटील यांनी शासकीय पद्मालय विश्रामगृहात हे निवेदन स्वीकारले. प्रभाग क्रमांक नऊचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंदूअण्णानगर ते खोटेनगर या मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या मार्गावरच तालुका पोलिस ठाणे, तलाठी व महसूल कार्यालय, कचरा फॅक्टरी, शिवाय मुख्य रस्त्याला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे नागरिकांसह शासकीय कामांसाठी येणाऱ्या नागरिकांचीही या मार्गावर मोठी वर्दळ असते. या रस्त्यावरून दररोज हजारो नागरिक ये-जा करतात. मात्र, रस्‍त्‍यावर असलेले खड्डे व चिखलामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात तर अधिकच त्रास सहन करावा लागत असतो. प्रा. पाटील यांनी नवलसिंग पाटील यांच्याशी संवाद साधून प्रभागातील नागरिकांना या रस्त्यावरून प्रवास करताना होत असलेल्या अडचणींची माहिती दिली. सोबतच रस्त्याच्या सध्यास्थितीचे फोटो व व्हिडिओही दाखवून त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात दिले. दरम्‍यान, पालकमंत्र्यांनी या प्रश्नांची तातडीने दखल घेऊन महापालिका आयुक्तांना निर्देश द्यावेत व चंदूअण्णानगर ते खोटेनगर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांना सुरक्षित व सुलभ वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी प्रा. डॉ. संदिप पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: ‘नणंद म्हणून माझ्या पतीची काळजी घ्या; सौमित्रा जरांगेंची अमृता फडणवीसांना साद, गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण द्या’

Moshi Waste Depot: नऊ कामगारांचा बळी, दोन महिन्यांनंतरही दोषी कोण?; मोशी कचरा डेपो दुर्घटनेच्या अंतिम अहवालाची प्रतीक्षा

तुळस पवित्र असूनही गणपतीला का वाहत नाहीत? 'या' पौराणिक कथेत दडलंय कारण

Latest Marathi News Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस सरकारने घेतले ७ मोठे निर्णय

Seena-Madha Irrigation: ‘गाढवाचंही लग्न होतंय, आमच्या पोरांचं काय?’; तुळशी ग्रामस्थांचा उद्विग्न सवाल; सीना-माढा योजनेत समावेशासाठी उपोषण

SCROLL FOR NEXT