नाशिक

‘एमपीएससी’मधे तत्काळ अन्‌ दीर्घकालिन उपाय योजना

CD
लोगो : सोमवारची मुलाखत -- फोटो : -- ‘एमपीएससी’मध्ये तत्काळ अन्‌ दीर्घकालीन उपाययोजना कृती दलाचे सदस्य डॉ. प्रवीण गेडाम यांची अंतिम अहवालाविषयी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा पध्दत, वेळापत्रक, प्रश्‍नपत्रिकांची सुरक्षितता यांसारख्या ज्वलंत मुद्द्यांवर परीक्षार्थी व पालकांचे प्रश्‍न व सूचना ऐकून घेण्यासाठी शीघ्र कृती दलाने सार्वजनिक संवाद कार्यक्रम सुरु केला आहे. राज्यातील सहा विभागांमध्ये हा कार्यक्रम होणार असून विद्यार्थी, पालक व हितधारकांचे सर्व प्रश्‍न, सूचना ऐकल्यानंतर ही समिती तत्काळ करण्यायोग्य आणि दीर्घकालीन उपाय अशा दोन टप्प्यातील उपाय योजना सुचविणारा अहवाल राज्य शासनाला सुपुर्द करणार असल्याची माहिती शीघ्र कृती दलाचे सदस्य तथा नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली. ‘एमपीएससी’च्या प्रश्‍नांसंदर्भात त्यांच्याशी साधलेला संवाद. - किरण कवडे … प्रश्‍न : उच्चस्तरीय कृती दलाच्या सार्वजनिक संवाद कार्यक्रम पुण्यात झाला, त्याविषयी काय सांगाल? डॉ. प्रवीण गेडाम : पुण्यात शनिवारी (ता. १२) झालेली बैठक ही नियोजित सहा सार्वजनिक संवाद आणि सुनावण्यांपैकी पहिली बैठक होती. या सुनावणीत ५०० पेक्षा अधिक विद्यार्थी, परीक्षार्थी उमेदवारांसह साधारणतः ६०० हुन अधिक व्यक्तींनी यात सहभाग घेत आपल्या अडचणी मांडल्या. समितीने सकाळपासून रात्री ८ वाजेपर्यंत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. … पहिल्याच बैठकीत कृती दलाकडे कुठले प्रश्‍न प्राप्त झाले? : उपस्थित व्यक्तींनी परीक्षेच्या विविध पैलूंशी संबंधित अनेक मुद्दे मांडले. यामध्ये परीक्षेचे वेळापत्रक, परीक्षेची पद्धत, वर्णनात्मक विरुद्ध वस्तुनिष्ठ प्रश्नपत्रिका, ऑनलाइन विरुद्ध ऑफलाइन प्रश्नपत्रिका, वैकल्पिक विषय घ्यायचे की नाही, शारीरिक चाचण्या, मुलाखती, परीक्षा शुल्क, महिला, दिव्यांग इत्यादींना भेडसावणाऱ्या समस्यांचा समावेश होता. त्यांनी विसंगतीची काही विशिष्ट उदाहरणे दिली. …. कृती दलाची समिती ३० सप्टेंबरला नाशिकला येत आहे. त्यातून काय साध्य होईल? : समिती ३० सप्टेंबरला नाशिकसह सर्व सहा महसूल विभागांमधील हितधारकांना भेटणार आहे. आम्ही विद्यार्थ्यांसह नागरिकांचे अभिप्राय घेणे सुरूच ठेवणार आहोत. आतापर्यंत आम्हाला सुमारे १८ हजार ई-मेलदेखील प्राप्त झाले आहेत. या सर्व प्रश्‍नांचा आम्ही साकल्याने विचार करून उपाययोजना करण्याच्या दृष्टीने विचार करत आहोत. ... ‘एमपीएससी’च्या परीक्षा पद्धतीत काय बदल होतील, असे आपणास वाटते? : समितीकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारी, सूचनांच्या आधारे आम्ही कृती योग्य अहवाल तयार करणार आहोत. यात तत्काळ करता येण्यासारख्या उपाय योजना आणि दीर्घकालीन सुधारणांचा समावेश असेल. त्यामुळे ‘एमपीएससी’ची परीक्षा अधिक सुरक्षित वातावरण देता येईल. परीक्षार्थींचा विश्‍वास अधिकाधिक वाढेल, यादृष्टीने आम्ही कामकाज करत आहोत.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

IND vs WI: ऋतुराज गायकवाड, रिषभ पंत, जडेजाचे पुनरागमन होणार? वेस्ट इंडिजविरुद्धच्या ODI मालिकेसाठी का होणार संघात बदल

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Marathi News Live Updates : गंगा नदीत बुडणाऱ्या १० बांगलादेशी नागरिकांची वाचवण्यात बीएसएफला यश

SCROLL FOR NEXT