नाशिक

सिंहस्थ कामांचा आणखी एक बळी

CD
पान २ वर मेन करणे -------------- NCTY26B60901 नाशिक : लहान मुलीसह रस्त्यावर ठिय्या देताना मृत सिद्धार्थ गोरे यांची पत्नी. ------------------ NCTY26B60900 नाशिक : नातेवाइकांशी चर्चा करताना कार्यकारी अभियंता संजय अगरवाल. ---------------- NCTY26B60894 नाशिक : ठिय्या आंदोलनप्रसंगी महापालिका प्रवेशद्वारावर नातेवाइकांशी चर्चा करताना पोलिस उपायुक्त मोनिका राऊत. ------------ NSK26H29545 कृषीनगर जॉगिंग ट्रॅक ः अपघातात चक्काचूर झालेली दुचाकी. NSK26H29546 अपघातस्थळी आडव्या पाइपाजवळ कोणताही सूचना फलक नसल्याचे दिसते. ------------------ तरुणाच्या नातेवाइकांचा मनपासमोर ठिय्या --- कृषीनगर रस्त्यावरील अपघात ः तीन तास ‘रास्ता रोको’; कारवाईसह मदतीसाठी महासभेत ठराव आणणार -------- सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १३ : कृषीनगर जॉगिंग ट्रॅककडून सिद्धार्थनगर झोपडपट्टीमार्गे तिबेटियन मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्यावर आडव्या टाकलेल्या जलवाहिनीच्या पाइपला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात सिद्धार्थ दत्तात्रय गोरे हा युवक ठार, तर एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी (ता. १२) रात्री अकराच्या सुमारास घडली असून, संतप्त नातलगांनी रविवारी (ता. १३) सकाळी साडेअकराच्या सुमारास युवकाच्या मृतदेहासह राजीव गांधी भवनच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठिय्या देत तेथेच रास्ता रोको आंदोलन सुरू केले. भर पावसात तब्बल तीन तास हे आंदोलन सुरू होते. मनपाच्या लेखी आश्वासनानंतर ते मागे घेण्यात आले. संबंधित ठेकेदाराविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ------------- सिद्धार्थ दत्तात्रय गोरे (वय ३३, रा. साईसिद्धी रो हाउस, साईग्रामनगर, अंबड) असे ठार झालेल्या युवकाचे नाव असून, त्याचा मित्र मनोज सूर्यवंशी हा गंभीररीत्या जखमी आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गंगापूर पोलिसांत सिद्धार्थच्या मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ठेकेदाराविरोधात तक्रार देण्यात आली. त्याच्या मागे पत्नी मानसी, दोन मुली, आई व भाऊ असा परिवार आहे. १६-१ ठेकेदाराच्या हलगर्जीचा बळी कामाच्या ठिकाणी ठेकेदाराकडून कोणतीही काळजी घेण्यात आलेली नसल्याचे आढळून आले. रात्री अपघात झाला, त्यावेळी ‘रस्ता वाहतुकीसाठी बंद’चा फलक लावण्यात आलेला नव्हता; परंतु रविवारी (ता. १३) पहाटेच तो लावण्यात आला. रेडियम रिफ्लेक्टरही लावण्यात आलेले नव्हते. रस्त्यावर आसपास पथदिवे नसल्याने अंधार होता. या अंधारात रस्त्यावरील आडवा पाइप न दिसल्यानेच अपघात झाल्याचे सिद्धार्थचे नातलग, मित्र, सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. ..... १६-१ नातलगांचा मनपासमोर ठिय्या रविवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात सिद्धार्थच्या मृतदेहाच्या विच्छेदनानंतर अंत्यविधीसाठी नेण्याऐवजी नातलगांनी थेट महापालिकेचे राजीव गांधी भवन गाठले अन प्रवेशद्वारासमोरच ठिय्या मांडला. सिंहस्थाच्या कामांमुळे सिद्धार्थचा बळी गेल्याने संबंधित ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यासह सिद्धार्थच्या पत्नीला महापालिकेत सामावून घेण्याची मागणी केली. तत्पूर्वी, नातलगांनी गंगापूर पोलिस ठाणे गाठून तत्काळ गुन्हा दाखल करून संशयितांना अटकेची मागणी केली. ..... १६-१ शरणपूर रस्त्यावर रास्ता रोको पोलिसांच्या मध्यस्थीनंतर मृतदेह हलविण्यात आला; परंतु पुन्हा काही वेळात नातलगांनी महापालिकेसमोर येऊन रस्त्यात ठिय्या मांडत ‘रास्ता रोको’ केला. महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी मृत सिद्धार्थच्या आईसह नातलगांशी फोनवरून संवाद साधत त्यांचे सांत्वन करीत योग्य कारवाईसह मदतीचे आश्वासनही दिले. परंतु, नातलग लेखी आश्वासनावर ठाम होते. नगरसेविका प्रियंका दोंदे, नगरसेविका प्रतिभा पवार, नगरसेवक शरद फडोळ, नगरसेवक किरण राजवाडे, माजी नगरसेवक राकेश दोंदे, ॲड. मनोज आहेर, ॲड. प्रशांत जाधव, ॲड. अजिंक्य गिते, प्रशांत खरात, गोविंद घुगे आदींसह राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला. ------------ महासभेत ठराव मांडणार सिद्धार्थच्या पत्नीला महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याची मागणी नातलगांनी केली. महापालिकेचे शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी आंदोलकांची भेट घेतली. नगरसेवकांनी येत्या आठवड्यात होणाऱ्या महासभेत ठराव मांडण्याचे आणि नातलगांच्या मागणीची पूर्तता करण्याचे आश्वासन दिल्यावर तब्बल तीन-साडेतीन तासांनंतर नातलगांनी आंदोलन मागे घेतले. ..... कोट अपघाताची घटना दुर्दैवी आहे. या अपघातात मृताच्या वारसास उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि महापालिकेच्या नियमांनुसार नुकसान भरपाई दिली जाईल. या कामाचा ठेका जिंदाल कंपनीकडे आहे. - संजय अग्रवाल, शहर अभियंता, नाशिक महापालिका .... कोट नातलगांच्या फिर्यादीनुसार, या प्रकरणी संबंधित ठेकेदाराविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासातून दोषीचे नाव निष्पन्न होईल, त्यानुसार संशयितांची नावे समाविष्ट केले जातील. - सुरेश आव्हाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, गंगापूर पोलिस ठाणे .....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Eknath Shinde Meeting : अमित शहा-एकनाथ शिंदे यांच्यात अर्धा तास चर्चा; एकाच कारमधून प्रवास, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

IND vs AFG, Video: बुमराह आला अन् दुसऱ्याच बॉलवर विकेट घेतली! भुवनेश्वर कुमारच्या पंक्तीत मिळवलं स्थान

पेट्रोल-डिझेल आणखी महागणार? सौदीची पाइपलाइन बंद, फक्त ५ ते ७ दिवसांचा तेलसाठा शिल्लक

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

युनायटेड किंगडममध्ये फूट पडणार? स्कॉटलंड, वेल्स अन् नॉर्दर्न आयर्लंडचे नेते करणार मोठी घोषणा?

SCROLL FOR NEXT