नाशिक

जागृती, चार्वीला दुहेरी मुकुट

CD
29570 नाशिकः विविध वयोगटातील विजयी खेळाडूंसमवेत उपस्‍थित पदाधिकारी. -- जागृती, चार्वीला दुहेरी मुकुट जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनतर्फे पारितोषिक वितरण सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. : १४ : जिल्हा बॅडमिंटन संघटनेतर्फे तिसऱ्या निवड स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ झाला. या स्‍पर्धेत जागृती जाधव व चार्वी कुलकर्णी यांनी दुहेरी मुकुट पटकाविले. स्‍पर्धेत विविध १६ वयोगटातून १९२ खेळाडूंनी सहभाग घेतला. पारितोषिक वितरण समारंभास संघटनेचे पदाधिकारी प्रमोद रानडे, डॉ. सुचेता बच्छाव, इवान फाउंडेशनचे वृषभ गोलिया उपस्‍थित होते. इवान फाउंडेशनच्या बॅडमिंटन स्टेडियममध्ये या स्पर्धा झाल्‍या. या प्रसंगी संघटनेचे सचिव पराग एकांडे, योगेश एकबोटे, दिलीप लोंढे यांच्‍यासह खेळाडू उपस्‍थित होते. स्पर्धा यशस्वीतेसाठी प्रमुख पंच म्हणून आदित्य आर्डे यांनी काम केले. स्‍पर्धेतील गटनिहाय विजेते असे- (अनुक्रमे विजेता व उपविजेता) ११ वर्षाखालील मुले- सुयोजय राजपूत, मैत्रेय मोहाडकर. मुली- सुमेधा मोरे, अनया रानडे. १३ वर्षाखालील मुले- गंधार पटवर्धन, आर्व भारद्वाज. मुली- कैरवी कुलकर्णी, आर्या जाधव. १५ वर्षाखालील मुले- योहान कल्याणी, गंधार पटवर्धन. मुली- जागृती जाधव, कैरवी कुलकर्णी. १७ वर्षाखालील मुले- आयुष बागुल, देव मानकर. मुली- जागृती जाधव, कैरवी कुलकर्णी. १७ वर्षाखालील मुले दुहेरी- बेनेट बिजू-राजवीर आढाव, श्लोक देशमुख-योहान कल्याणी. १९ वर्षाखालील मुले- हर्षित नेरकर. मुली- चार्वी कुलकर्णी, अदविका चव्हाण. १९ वर्षाखालील मुली दुहेरी- आकांक्षा घोडके-त्रिशा ठक्कर. पुरुष एकेरी- ईशान वानखेडे, हर्षित नेरकर. महिला एकेरी- चार्वी कुलकर्णी, शौर्या बच्छाव महिला दुहेरी- चित्रा गुंजाळ-विद्या गोंड पुरुष दुहेरी- आदित्य म्हात्रे-विनायक दंडवते, अमित देशपांडे-हर्षित नेरकर

भारताचा किरकोळ महागाई दर वाढला! सलग तिसऱ्या महिन्यात किंमती वाढलेल्याच, अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर काय?

VAIBHAV SOORYAVANSHI: संजू सॅमसन की वैभव सूर्यवंशी? दुसऱ्या टी-२०आधी टीम इंडियासमोर मोठा सवाल; ‘या’ समस्येचाही शोधावा लागणार उपाय

Vastu Tips: घरात मांजर पाळताय? मांजर पाळण्यापूर्वी जाणून घ्या वास्तुचे 'हे' नियम; नाहीतर वाढेल नकारात्मक ऊर्जा!

Interesting Money Story: कुत्र्याला फिरवायला गेले अन् नशीबच पालटलं! ना लॉटरी, ना वारसा... एका क्षणात झाले करोडपती; नेमकं काय घडलं?

अंकिता वालावलकरने गणेशोत्सवादिवशीच दिली गुडन्यूज, मुंबईत घेतलं स्वतःचं घर; कुठे आहे तिचा २ बीएचके? म्हणते- सध्या इंटेरिअर...

SCROLL FOR NEXT