नाशिक शहरात पाचशे
गणेश मंडळांना परवानग्या
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १३ : शहरातील गणेश मंडळांकडून परवानग्यांसाठीची लगबग शेवटच्या दिवसांपर्यंत सुरूच होती. रविवारी (ता. १३) सायंकाळपर्यंत पोलिस आयुक्तालयाकडून शहरातील सुमारे ५०० सार्वजनिक गणेश मंडळांना परवानग्या देण्यात आलेल्या आहेत.
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये दरवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक गणेश मंडळांसाठी ‘एक खिडकी’ योजनेंतर्गत ऑनलाइन परवानगी प्रक्रिया राबविली. त्यासाठी गणेश मंडळांनी पोलिस आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर जाऊन परवानगीसाठी आवश्यक प्रमाणपत्रांसह पाठपुरावा केला. त्यानुसार परिमंडळ एकमध्ये सुमारे ३००, तर परिमंडळ दोनमध्ये २५० गणेश मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. सदर प्रक्रिया परिमंडळ उपायुक्तांच्या कार्यालयातून देण्यात आल्या आहेत. शहरातील गणेश मंडळांनी परवानगीसाठी महापालिका आणि पोलिस आयुक्तालयाकडून महिनाभरापूर्वीपासूनच पाठपुरावा केलेला होता. त्यामुळे मंडळांनी मंडप उभारणी सुरू केली होती. अवघ्या काही तासांवर श्री गणरायाचे आगमन आलेले असताना मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात आहे. त्यातच पावसाची संततधार सुरू असल्याने मंडळ उभारणीला अडथळा येत असला तरी कार्यकर्त्यांकडून जय्यत तयारी सुरू आहे. दरम्यान, गतवर्षी शहर हद्दीत ७३० गणेश मंडळांनी श्रींची प्रतिष्ठापना केली होती. तसेच, कोणत्याही गणेश मंडळाची परवानगी आयुक्तालयाकडून नाकारण्यात आलेली नाही. असे असले तरी, परवानगी न घेणाऱ्या मंडळांवर कायदेशीर कारवाईचा इशाराही आयुक्तालयाने दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.