नाशिक

खव्याऐवजी केमिकलचा वापर; ९२३ किलो तूप, क्रीम व प्रोप्रायटरी फूड जप्त

CD
सेकंडमेन --- मिठाईत खव्याऐवजी केमिकलचा वापर ------ तब्बल ९२३ किलो पदार्थ जप्त; सणासुदीच्या काळात भेसळखोरांवर कारवाई सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १४ : श्रीगणेशोत्सव व आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांविरुद्ध अन्न व औषध प्रशासन(एफडीए) विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. जळगाव शहर व पाचोरा येथे केलेल्या कारवाईत गुजरातहून आणलेले संशयास्पद प्रोप्रायटरी फूड, भेसळयुक्त तुप व क्रीम असा एकूण ९२३.४ किलो वजनाचा व चार लाख ३६ हजार २२२ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त दिनानाथ शिंदे यांनी ही माहिती दिली. अन्नसुरक्षा अधिकारी अमोल जगताप यांच्या पथकाने गुरुवारी (ता.१०) जळगाव शहरातील अग्रवाल वेफर्स व नमकीन येथे तपासणी केली. या ठिकाणी गुजरातहून मागविलेले ३७० किलो वजनाचे ९३ हजार २० रुपयांचे प्रोप्रायटरी फूड आढळून आले. खव्याऐवजी वापरण्यात येणारा हा संशयास्पद पदार्थ दिसायला खवा व बर्फीसारखा आहे. त्याचा वापर मिठाई तयार करण्यासाठी केला जात असल्याचे तपासणीत आढळून आले. दुधापासून तयार केलेल्या अस्सल खव्याऐवजी स्वस्त पर्याय म्हणून अशा पदार्थाचा वापर करून पेढे व बर्फी तयार केली जात असल्याचा संशय आहे. त्यानंतर पथकाने पाचोरा येथेही दोन ठिकाणी कारवाई करून सुमारे २ हजार ५०० रुपयांचा संशयास्पद साठा नष्ट केला. पाचोरा येथील कारवाईत १ लाख ३२ हजार ३९२ रुपये किमतीचे १७४.२ किलो संशयास्पद तूप तसेच २ लाख ८ हजार ५६० रुपये किमतीचे ३७९.२ किलो क्रीम जप्त करण्यात आले. ....... अशी ओळखावी भेसळ? पेढा किंवा खवा हातावर चोळल्यास तो अनावश्यकपणे तेलकट किंवा चिकट जाणवत असेल व त्याला नैसर्गिक दुधाचा वास नसेल, तर भेसळीचा संशय घ्यावा. शुद्ध दुधापासून तयार केलेला पेढा साधारणपणे किंचित तांबूस-लालसर छटा असलेला असतो. अतिशय पांढरा शुभ्र रंग संशय निर्माण करू शकतो. ....... नागरिकांनी सावध राहावे सणासुदीच्या काळात स्वस्त दरात मिळणाऱ्या किंवा अनधिकृत ठिकाणी तयार केलेल्या मिठाई, खवा, तुप व दुग्धजन्य पदार्थांची खरेदी करताना नागरिकांनी काळजी घ्यावी. निकृष्ट किंवा संशयास्पद दर्जाचा खाद्यपदार्थ आढळल्यास अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Ahilyanagar Crime: खर्ड्यात तान्हाजी बोराडे खूनप्रकरणाचा दोन दिवसांत छडा; १८ वर्षीय तरुणासह तीन अल्पवयीन ताब्यात

Marathi News Live Updates : तलावातून निघते गणरायाची पालखी; रायगडच्या साले गावातील अनोखी परंपरा

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

SCROLL FOR NEXT