नाशिक

मालेगावी १८ शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा

CD
मालेगावी १८ शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा गौणखनिज प्रतिष्ठान : ५० लाखांचा निधी; रस्त्याचे काँक्रिटीकरण सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १४ : जिल्हा गौणखनिज प्रतिष्ठानमधून मालेगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १८ शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेंतर्गत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष खाणबाधित क्षेत्रातील शैक्षणिक तसेच भौतिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी जिल्हा खनिज प्रतिष्ठानमधून निधी दिला जातो. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी तथा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी मालेगावमधील विकासकामांसाठी ५० लाखांचा निधी उपलब्ध करून दिला. या निधीतून तालुक्यात १९ विकासकामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये १८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. या प्रत्येक कामासाठी एक लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या आघार खुर्द (बंधारपाडा), काष्टी, घाणेगाव, टिंगरी, वाके (डोंगराळे), निळगव्हाण, पांढरूण, रावळगाव, वडेल, सौंदाणे, आघार खुर्द, अंजन, वडेल (उंबरेश्वर), कंदाणे, लेंडाणे, गुगळवाड, मोहपाडा आणि टिपे येथील प्राथमिक शाळांसाठी हा निधी देण्यात आला आहे. ही सर्व कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहेत. सोयगाव-फौजदारवाडीचे काँक्रिटीकरण भौतिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सोयगाव उपकेंद्र ते फौजदारवाडी (ग्रामा-२३५) रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी ३२ लाखांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. हे काम जिल्हा परिषदेच्या इवद क्रमांक-२ कार्यकारी अभियंता विभागामार्फत पूर्ण केले जाईल. रॉयल्टी भरावी : जिल्हाधिकारी जिल्ह्यातील खाणधारक आणि गौणखनिज उत्खननदारांनी स्वामित्वधन (रॉयल्टी) पारदर्शकपणे तसेच वेळेत जमा करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केल्या आहेत. जमा होणाऱ्या स्वामित्वधनातून जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या माध्यमातून खाणबाधित भागांतील शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा, ग्रामीण रस्त्यांचे काँक्रिटीकरण तसेच विविध लोककल्याणकारी विकासकामे हाती घेणे शक्य होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताचा किरकोळ महागाई दर वाढला! सलग तिसऱ्या महिन्यात किंमती वाढलेल्याच, अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर काय?

VAIBHAV SOORYAVANSHI: संजू सॅमसन की वैभव सूर्यवंशी? दुसऱ्या टी-२०आधी टीम इंडियासमोर मोठा सवाल; ‘या’ समस्येचाही शोधावा लागणार उपाय

Vastu Tips: घरात मांजर पाळताय? मांजर पाळण्यापूर्वी जाणून घ्या वास्तुचे 'हे' नियम; नाहीतर वाढेल नकारात्मक ऊर्जा!

Interesting Money Story: कुत्र्याला फिरवायला गेले अन् नशीबच पालटलं! ना लॉटरी, ना वारसा... एका क्षणात झाले करोडपती; नेमकं काय घडलं?

अंकिता वालावलकरने गणेशोत्सवादिवशीच दिली गुडन्यूज, मुंबईत घेतलं स्वतःचं घर; कुठे आहे तिचा २ बीएचके? म्हणते- सध्या इंटेरिअर...

SCROLL FOR NEXT