(समर्पक सिंगल कॉलम चित्र वापरावे)
---------
बसस्थानकांवर दागिने चोरणाऱ्यास अटक
---
साडेचार लाखांच्या ऐवजासह गुन्हे शाखेने घेतले ताब्यात
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १४ : जिल्ह्यातील विविध तालुक्यांत गर्दीच्या बसस्थानकांवर महिलांचे मंगळसूत्र, पोत व सोनसाखळी चोरी करणारा अट्टल गुन्हेगार गुन्हेशाखेच्या हाती लागला आहे. संशयास्पद हालचालींवरून त्याला ताब्यात घेतल्यावर अंगझडतीत २७ ग्रॅम वजनाचे एकूण चार लाख ५९ हजार रुपयांचे चोरीचे दागिने मिळून आले आहेत.
जिल्ह्यातील जवळपास सर्वच बसस्थानकांवर दागिने चोरीच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत. याचीच दखल घेत पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे निर्देश दिले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या पथकाला शोधकार्यात लावण्यात आले होते.
आजीचे दागिने नाहीच
धुळे येथील रहिवासी प्रभावती पंडितराव विसपुते (वय ६०) या शनिवारी (ता.१२) सायंकाळी साडेसात ते आठच्या सुमारास जळगावच्या नवीन बसस्थानकावरून बसमध्ये चढत होत्या. त्याचवेळी अज्ञात चोरट्याने त्यांचे दागिने लंपास केल्याची घटना घडली. या प्रकारानंतर गुन्हेशाखेने तपास चक्रे गतिमान केली. आजीबाईंचे दागिने तर सापडले नाहीत, मात्र इतर तीन पोलिस ठाण्यांत दाखल गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. या चोरट्यांची अधिक चौकशी सुरू आहे.
चोरट्याच्या बॅगेत सोनं...
जळगाव येथील नवीन बसस्थानकावर शनिवारी(ता.१२) एक तरुण संशयास्पदरित्या फिरताना आढळला. पथकाने त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता, त्याने आपले नाव सागर दादासाहेब जाधव (वय ३१, रा. खर्डे, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) असे सांगितले. पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या बॅगेत सोन्याचे दागिने मिळून आलेत.
तीन पोलिस ठाण्यांत गुन्हे
पोलिसी खाक्या दाखविताच ताब्यातील संशयिताने मुक्ताईनगर, एरंडोल व जामनेर येथील बसस्थानकांवर गर्दीचा फायदा घेऊन महिला व प्रवाशांचे दागिने लांबविल्याची कबुली दिली. जळगावात झालेल्या चोरीबाबत अधिक चौकशी सुरू आहे.
साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हेशाखेने ताब्यात घेतलेल्या सागर दादासाहेब जाधव याच्याकडून २७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (किंमत ४ लाख ५९ हजार रुपये) जप्त केले आहेत. अटकेतील संशयिताला पुढील तपासासाठी मुद्देमालासह एरंडोल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.