धुळे टुडे २ साठी मेन...
---
फोटो-NSK26H29600
धुळे : श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी समता नगरजवळील पांझरा नदीकाठी ठेवलेली टाकी.
---
पांझरा नदीकाठी ११ ठिकाणी मूर्ती विसर्जन सुविधा
---
महापालिकेची तयारी; गणेशमूर्ती व निर्माल्य संकलनासाठी स्वतंत्र वाहनांसह स्वच्छता पथके
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १४ : श्री गणरायाचे अत्यंत उत्साह आणि भक्तीपूर्ण वातावरणात आगमन झाल्यानंतर मंगळवार (ता. १५) पासूनच विविध दिवसांच्या गणपती मूर्तींचेही विसर्जन सुरू होईल. या पार्श्वभूमीवर धुळे महापालिकेने मूर्ती विसर्जनाच्या अनुषंगाने तयारी पूर्ण केली आहे. शहरातील पांझरा नदी काठावर अकरा ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जन व निर्माल्य संकलनाची सोय करण्यात आली आहे.
---
श्री गणरायाच्या मूर्तींची विधिवत स्थापना झाल्यानंतर दीड दिवस, तीन, पाच, सात, आठ, नऊ, दहा, अकरा व बारा दिवस असे टप्प्याटप्प्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येते. या पार्श्वभूमीवर भाविकांना सुरक्षित व सुलभपणे विसर्जन करता यावे, यासाठी पांझरा नदीकाठावर ठिकठिकाणी कृत्रिम तलाव तसेच पाण्याच्या टाक्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
या ठिकाणी व्यवस्था
महापालिकेतर्फे कुमारनगर-समतानगर घाट, झुलता पूल, जॉगिंग ट्रॅक, अग्रवाल भवन, दाता सरकार, नकाणे रोड पूल, श्री सिद्धेश्वर हॉस्पिटलजवळ, जयहिंद जलतरण तलाव, स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्याजवळ, एकवीरादेवी मंदिरासमोर आणि हत्तीडोह अशा अकरा ठिकाणी मूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जनस्थळी श्री गणेशमूर्ती व निर्माल्य स्वतंत्रपणे संकलित करण्यासाठी महापालिकेने वाहनांची व्यवस्थाही केली आहे.
कर्मचाऱ्यांची नियुक्ती
श्री गणेशमूर्ती व निर्माल्य संकलनासह अनुषंगिक कामांसाठी महापालिका आरोग्य विभागातील दोन मुख्य स्वच्छता निरीक्षक, १९ स्वच्छता निरीक्षक, ४० मुकादम आणि ३०० स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक विसर्जनस्थळी स्वच्छता कर्मचारी व अधिकारी सकाळी व सायंकाळी अशा दोन सत्रांत उपस्थित असतील.
मंडळांच्या ठिकाणी स्वच्छता
शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या ठिकाणी दिवसातून दोन सत्रांत स्वच्छतेची व्यवस्था करण्यात आली आहे. गणेश मंडळांच्या ठिकाणी निर्माण होणारा कचरा तत्काळ उचलण्याबाबत संबंधित यंत्रणेला आदेश देण्यात आले आहेत. गणेशोत्सव काळात स्वच्छता कायम राहावी, यादृष्टीने स्वच्छता पथके कार्यरत राहणार आहेत.
---
...चौकट...
नागरिकांना आवाहन
गणेशभक्तांनी महापालिकेने उपलब्ध केलेल्या श्रीगणेश मूर्ती विसर्जन सुविधांचा लाभ घ्यावा. नदीपात्रात कचरा, निर्माल्य किंवा इतर साहित्य न टाकता ते नियुक्त केलेल्या महानगरपालिका कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द करावे. तसेच, विसर्जनाच्यावेळी प्रशासनास सहकार्य करून पर्यावरणपूरक व स्वच्छ गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन धुळे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.