नाशिक

महसुल लोक अदालत

CD
धुळे टुडे १ साठी...(शिल्लक, तपासून घ्यावी) --- जिल्ह्यात महसूल लोक अदालत अभियान --- हेमंत सानप; अपीलदारांना अर्ज करण्याचे आवाहन --- सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १४ : महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार राज्यभर ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. या अभियानांतर्गत भूमि अभिलेख विभागाकडे प्रलंबित असलेली अपील, पुनरिक्षण, पुनर्विलोकन तसेच इतर दावे तडजोडीच्या माध्यमातून निकाली काढण्यासाठी संबंधितांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन भूमी अभिलेखचे जिल्हा अधीक्षक हेमंत सानप यांनी केले आहे. जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख धुळे, उपअधीक्षक भूमि अभिलेख धुळे, साक्री, शिंदखेडा व शिरपूर तसेच नगर भूमापन अधिकारी, धुळे यांच्या स्तरावरील प्रकरणे शासनाच्या सूचनांनुसार लोक अदालत अभियानाद्वारे तडजोडीने निकाली काढण्यात येणार आहेत. अभियान कालावधी असा या अभियानांतर्गत जिल्हा व अधिनस्त सर्व तालुकास्तरावर सकाळी अकरापासून लोकअदालतांचे आयोजि करण्यात येणार आहे. वेळापत्रक असे : २३ सप्टेंबर, २३ डिसेंबर २०२६, २४ मार्च २०२७. संबंधित अपीलदार, सामनेवाले अथवा त्यांच्या प्राधिकृत प्रतिनिधींनी जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, धुळे, उपअधीक्षक भूमि अभिलेख धुळे, साक्री, शिंदखेडा, शिरपूर तसेच नगर भूमापन अधिकारी, धुळे यांच्या कार्यालयांमध्ये उपस्थित राहून लोक अदालत तडजोडनामा अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक श्री. सानप यांनी केले आहे. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Interesting Money Story: कुत्र्याला फिरवायला गेले अन् नशीबच पालटलं! ना लॉटरी, ना वारसा... एका क्षणात झाले करोडपती; नेमकं काय घडलं?

अंकिता वालावलकरने गणेशोत्सवादिवशीच दिली गुडन्यूज, मुंबईत घेतलं स्वतःचं घर; कुठे आहे तिचा २ बीएचके? म्हणते- सध्या इंटेरिअर...

Nirgudsar Theft : बंद घरावर चोरट्यांचा डल्ला; २८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि १५ हजार रुपये रोख रक्कम नेली चोरून

दगडूशेठ बाप्पाला हे नाव कसं मिळालं? जाणून घ्या दगडूशेठ हलवाईंची कहाणी

TMC rebels join BJP: 'तृणमूल'चे १७ बंडखोर खासदार भाजपच्या वाटेवर? NCPI नेत्याचं धक्कादायक विधान

SCROLL FOR NEXT