नाशिक

गणपती प्रसाद उलाढाल

CD
शक्य असल्यास मेनच्या बाजूला किंवा जवळ घ्यावी ====== गणरायाच्‍या आगमनाला सव्‍वाकोटीचा प्रसादविक्री --- मोदकसह लाडूला पसंती; फुलविक्रीतूनही मोठी उलाढाल सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १४ : गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी प्रसादाच्या विक्रीतून सुमारे सव्वाकोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यात प्रामुख्‍याने मोदक, खोबऱ्याचा प्रसाद, पेढे, लाडूसह विविध प्रकारच्या प्रसादाला अधिक पसंती होती. सोबतच फुले, हार, दुर्वा व पूजासाहित्याच्या विक्रीतूनही मोठी उलाढाल झाल्‍याचा अंदाज आहे. श्रीगणरायाच्या आगमनापूर्वीपासूनच बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी होती. मात्र, सोमवारी (ता.१४) सकाळपासूनच प्रसाद व पूजासाहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी होती. घरगुती गणपतीसोबतच सार्वजनिक गणेश मंडळांकडूनही प्रसादाची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली. यातून साधारण सव्‍वाकोटीपर्यंत उलाढाल झाल्‍याचा अंदाज आहे. खोबऱ्याच्या प्रसादाचीही मागणी मोदकासोबतच बेसन लाडू, बुंदी लाडू, मोतीचूर लाडू व खोबऱ्याच्या प्रसादाला मागणी वाढली आहे. गणरायाला नैवेद्य दाखविल्यानंतर प्रसाद म्हणून वाटप करण्यासाठी अनेकांकडून लाडू व खोबऱ्याच्या प्रसादाची खरेदी करण्यात आली. त्यामुळे मिठाई विक्रेत्यांकडे सकाळपासून ग्राहकांची वर्दळ होती. फुलांच्या विक्रीही वाढली गणपतीच्या पुजेसाठी फुलांना विशेष महत्त्व असल्याने फुलबाजारातही मोठी उलाढाल झाली. झेंडू, शेवंती, गुलाब, मोगरा आदी फुलांसह विविध प्रकारच्या फुलहारांना मागणी होती. उत्‍सवाच्‍या पार्श्वभूमीवर झेंडूच्‍या फुलांचे दरदेखील वाढून ७० ते ८० रुपये प्रतिकिलोने विक्री झाली. गणेशमूर्तीची सजावट, घराची आरास व पूजेसाठी नागरिकांनी फुले व हारांची खरेदी केली. सार्वजनिक मंडळांकडूनही मोठ्या प्रमाणावर फुलांची मागणी झाली. यामधूनही मोठी उलाढाल झाली. इन्‍फो मोदकाला सर्वाधिक पसंती गणेशोत्सव व मोदक हे समीकरण असल्याने यंदाही मोदकाला मोठी मागणी आहे. गणरायाच्या आगमनाच्‍या दिवशी प्रसाद म्‍हणून मोदकाचाच प्रसाद चढविला जातो. याअनुषंगाने उकडीचे मोदक, तळलेले मोदक, माव्याचे मोदक, ड्रायफ्रूट मोदक यांसह विविध प्रकारच्‍या मिठाईतील मोदक बाजारात उपलब्ध आहेत. घरगुती गणपतीसाठी नैवेद्य दाखविण्यासाठी नागरिकांकडून मोदकाची खरेदी करण्यात आली. काहींनी घरच्या घरी मोदक तयार करण्यासाठी आवश्यक साहित्याचीही खरेदी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uruli Kanchan Ganeshotsav security: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचनमध्ये पोलिसांचा प्रभावी रूट मार्च; कायदा-सुव्यवस्थेसाठी कडक तयारी

Pune Civic Tenders: महापालिकेच्या निविदांवर आयुक्तांचा लगाम; जुन्या निविदांतून वाढीव व नवीन कामांना बंदी

Pune Negligent Driving: सोरतापवाडी फाट्यावर टेम्पोच्या धडकेत दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; निष्काळजी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Maratha Reservation : सरकारने परवानगी नाकारली; मनोज जरांगे पाटील एकटेच सहकारीसोबत मुंबईत जाणार

Pune Civic Row: स-यादीतून बाकडे, पिशव्या खरेदीला मनसेचा कडवा विरोध; महापालिका आयुक्तांकडे निवेदन

SCROLL FOR NEXT