मेन
फोटो : H29610, H29611
नाशिक : शहरातील विविध स्टॉलवर गणेशमूर्ती खरेदीसाठी भाविकांची गर्दी झाली होती. दुचाकी तसेच चारचाकी वाहनांतून गणरायाला घेऊन जाताना भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. परिसरात दिवसभर गणरायाच्या जयघोषाने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. (छायाचित्रे : विकी कदम )
--
फोटो : H29620, H29624
नाशिक : रविवार कारंजा येथील चांदीच्या गणपतीची पारंपारिक ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. दुसऱ्या छायाचित्रात
गुलालवाडी व्यायामशाळेच्या गणरायाची काढण्यात आलेली मिरवणूक काढण्यात आली. (सर्व छायाचित्रे : केशव मते)
--
चैतन्याची लहर घेऊन गणरायाचे घरोघरी आगमन
ढोलताश्यांनी गणेशाचे स्वागत; अबालवृद्धांचा जल्लोष
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १४ : गणराया म्हणजे चैतन्याचा खळाळता झरा, गणेश चतुर्थीचा मुहूर्त साधून चैतन्याचे हे स्वरूप घरोघरी आणत भाविकांनी त्याची मनोभावे प्रतिष्ठापना केली. गणराया घरात आल्यानंतर पूजाविधी करून मंगलमय आरती करण्यात आली आणि बारा दिवसांसाठी मयूरेश मोरया म्हणून प्रसिद्ध असलेला गणेश घरोघरी विराजमान झाला.
गणेशभक्तांनी अभिजित मुहूर्त साधत श्रीगणेशाला स्थापन करून फळभाज्यांचा नैवेद्य दाखवत, उकडीचे तसेच तळलेल्या मोदकांचा प्रसाद बालगोपाळांसह घरातील थोरामोठ्यांना देत गणरायाचे मंगलमय आगमनाची गोड केले. गोल्फ क्लब मैदान, ठक्कर डोम, गंगापूर रोड, शालीमार, रविवार कारंजा, अशोकस्तंभ, मेनरोड या सर्व ठिकाणी असलेल्या स्टॉल्सवर गणरायाला नेण्यासाठी गर्दी केली होती. पावसाचे वातावरण झाल्याने अनेकांची धावपळ झाली. बऱ्याच ठिकाणी पाऊस चांगलाच कोसळल्याने गणरायाला घरी नेताना चारचाकीतून, रिक्षा आणि मिळेल त्या वाहनातून घरी नेण्यात आले. रस्ते ठिकठिकाणी खणून ठेवण्यात आल्याने तसेच चिखलाचे साम्राज्य झाल्याने भाविकांचे काही प्रमाणात हाल झाले. मात्र गणेशोत्सव म्हणजे आनंदाचा उत्सव असल्याने मिळेल ते वाहन घेऊन पाटावर विराजमान असलेले गणराया घरोघरी विराजमान झाले.
---
ट्रेडिंग गणेश मूर्तींची चलती
पारंपरिक मूर्तींमध्ये लालबागचा राजा, पेशवा पगडीवाला गणेश यांच्या खरेदीबरोबरच ट्रेडिंगचे गणेशमूर्तींची अधिक चलती होती. मखमलीचे फेटे, शेले, कमरपट्टे, बिंदी यासह आणखीही प्रचंड साज असलेल्या गणेशाच्या मूर्ती मोठ्या प्रमाणात विक्री झाल्या. यंदाच्या वर्षी गणरायाचे विविध अवतार, भगवान शंकर, श्री स्वामी समर्थ, शंकर महाराज, क्रिकेटर, सेल्फी घेणारा गणेश, पहुडलेल्या स्वरूपातील बालगणेश, कृष्णस्वरूप गणेश अशा मूर्ती मोठ्या प्रमाणात असून त्यांचीही चांगली विक्री झाली.
---
पूजा साहित्य विक्रीची धावपळ
लाल वस्त्र, नारळ, हळुकुंड, खोबरे, खारीक, बदाम आणि सुपारी हे पूजेचे सर्व साहित्य, नागवेलीची पाने, जास्वंदीची फुले, माळा, फुले, पूजापत्री, केवड्याचे फुल आणि पूजेच्या तत्सम वस्तू विक्रीसाठी झालेली गर्दी हा गणेशोत्सवाचा एक भाग. नागरिकांनी प्रचंड संख्येने या वस्तू घेण्यासाठी गर्दी केली होती. गणपतीच्या स्टॉलशेजारीच ही पूजा साहित्याची दुकाने असल्याने भाविकांना सायीचे होत होते.
---
ढोल-ताशा वाजवणाऱ्यांची चांदी
गणरायाचे आगमन म्हणजे शुभघटना आणि त्यासाठी मंगलवाद्ये हवीच म्हणून पारंपरिक पद्धतीने शहरातील गणरायाच्या प्रत्येक स्टॉलजवळ ढोल-ताशेवाले अंतरा अंतराने उभे होते. ढोल ताशा वाजवत गाडीपर्यंत गणपती नेण्यासाठी १०१ रुपये मोजावे लागत होते. जागेवर वाजवण्याचे ५१ रुपये घेण्यात येत होते मात्र गणरायासाठी कुटुंबे ढोलताशाला पसंती देत होती.
---
भाविकांनी साधला स्थापनेचा मुहूर्त
गणेश चतुर्थी व हरितालिका एकाच दिवशी आल्याने दोघा पूजनासाठी सकाळचा कालावधी महत्त्वाचा होता. गणेश स्थापनेसाठी दुपारी १.४४ पर्यंतचा मुख्य मुहूर्त होता. हा मुहूर्त साधण्यासाठी भाविकांची एकच धावपळ उडाली. बुक करून ठेवलेल्या आणि नव्याने मूर्ती आणणारे यांनी सकाळपासूनच दुकानांमध्ये रांगा लावल्या होत्या. घरातील पार्थिव गणेशाची स्थापना व पूजन यासाठी लगबग सुरू होती. पूजेची सामग्री घेत भाविकांनी स्थापनेचा मुहूर्त साधला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.