नाशिक

सोन्याचा वर्क असलेला मोदक २७ हजार रूपये किलो

CD
सोन्याचा वर्क लावलेला मोदक २७ हजार रुपये किलो --- सुकामेव्याच्या सारणापासून ब्लूबेरी, कुनाफापर्यंत पर्याय; मोदकांच्या २२ फ्लेवरने गणेशोत्सवाची गोडी द्विगुणित सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १४ : ब्लूबेरी, कुनाफा, मोतीचूर, पान, अंजीर, मलई, केसर, पिस्ता, खोबरे अशा तब्बल २२ प्रकारच्या मोदकांनी सोमवारी (ता. १४) गणेशोत्सवाची गोडी द्विगुणित केली. पारंपरिक उकडीच्या व तळणीच्या मोदकांबरोबरच बदलत्या खवय्यांच्या पसंतीनुसार विविध फ्लेवरचे मोदक बाजारात उपलब्ध झाले आहेत. विशेष म्हणजे सुकामेव्याचे सारण असलेल्या मोदकांना सोन्याचा वर्क लावून ते तब्बल २७ हजार रुपये किलो दराने, तर चांदीचा वर्क लावलेले मोदक दोन हजार रुपये किलो दराने खास खवय्यांसाठी तयार करण्यात आले आहेत. सणवार म्हटला, की नानाविध खाद्यपदार्थांची चंगळ आलीच. गणपतीला प्रिय असलेला मोदक गणेशभक्तांच्याही विशेष पसंतीचा असल्याने गणेशोत्सवाच्या काळात त्याला मोठी मागणी असते. गणरायाचे आगमन झाल्यापासून अनंत चतुर्दशीपर्यंत मोदकांचा आस्वाद घेण्याची पर्वणीच खवय्यांना मिळते. त्यामुळे मोदक हा गणेशोत्सवातील केवळ नैवेद्याचा पदार्थ न राहता खवय्यांसाठी आनंदाचा सोहळा ठरला आहे. दरवर्षी पारंपरिक मोदकांबरोबर नवनवीन प्रयोग केले जातात. यंदाही विविध खाद्यपदार्थांच्या फ्लेवरचा वापर करून मोदकांचे आकर्षक प्रकार तयार करण्यात आले आहेत. गणेश मंडळांसाठी खास डिझायनर मोदकही तयार करण्यात आले. साखर टाळणाऱ्या खवय्यांसाठी शुगरफ्री, तर आहाराबाबत सजग असणाऱ्यांसाठी डाएट मोदकांचीही सोय करण्यात आली आहे. त्यामुळे पारंपरिक चवीपासून हटके फ्लेवर आणि महागड्या मोदकांपर्यंत गणेशोत्सवात खवय्यांसाठी पर्यायांची रेलचेल पाहायला मिळते. कोट दरवर्षीप्रमाणे यंदाही मोदकांना चांगली मागणी आहे. २२ प्रकारांपैकी मलई, केसर आणि खोबऱ्याच्या मोदकांना अधिक पसंती मिळते. - मोदाराम चौधरी, सागर स्वीट्स फोटो : सोन्याचा वर्क असलेला मोदक. (२९६४१) आणि डिझायनर मोदक. (२९६४२). -----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हिवाळी अधिवेशानात राज्यात लागू होणार समान नागरी कायदा? CM फडणवीसांनी दिली मोठी अपडेट, काय म्हणाले?

Uruli Kanchan Ganeshotsav security: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचनमध्ये पोलिसांचा प्रभावी रूट मार्च; कायदा-सुव्यवस्थेसाठी कडक तयारी

Pune Civic Tenders: महापालिकेच्या निविदांवर आयुक्तांचा लगाम; जुन्या निविदांतून वाढीव व नवीन कामांना बंदी

Pune Negligent Driving: सोरतापवाडी फाट्यावर टेम्पोच्या धडकेत दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; निष्काळजी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Maratha Reservation : सरकारने परवानगी नाकारली; मनोज जरांगे पाटील एकटेच सहकारीसोबत मुंबईत जाणार

SCROLL FOR NEXT