नाशिक

अवैध मुद्देमाल जप्त

CD
धुळे : टुडे पान ४ साठी... -- फोटो क्रमांक : 29666 बोरकीखडी (ता. साक्री) : बायोडिझेल व केमिकलविरोधात महसूल, पुरवठा विभाग आणि पोलिसांच्या कारवाई ताब्यात घेण्यात आलेल्या ट्रकसह अप्पर तहसीलदार अधिकार पेंढारकर. शेजारी पथकातील अधिकारी, कर्मचारी. -- बोरकीखडीत पावणेनऊ लाखांचा अवैध मुद्देमाल जप्त -- महसूल, पुरवठा व पोलिसांची संयुक्त कारवाई; दोघांवर गुन्ह्याची प्रक्रिया सकाळ वृत्तसेवा साक्री, ता. १५ : तालुक्यातील बोरकीखडी आणि भोणगाव परिसरात अवैधरित्या साठवून ठेवण्यात आलेल्या बायोडिझेल व केमिकलविरोधात महसूल, पुरवठा विभाग आणि पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई केली. या कारवाईत बायोडिझेल, केमिकल व वाहनासह आठ लाख ७७ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन जणांवर गुन्ह्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. - बोरकीखडी येथील हॉटेल चांदणीवर संयुक्त पथकाने छापा टाकला. या वेळी तेथे अवैधरित्या साठवून ठेवलेले बायोडिझेल आढळून आले. हॉटेलमालक हुसेन भाई उमर भाई जुने जा (रा. बोरकीखडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत तीन लाखांचे किमतीचे बायोडिझेल आणि पाच लाखांचे किमतीचे वाहन असा आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुसऱ्या कारवाईत भोणगाव येथील गौरी पेट्रोल पंपाच्या पाठीमागील शिवारात पुरवठा विभागाने छापा टाकला. पाहणीदरम्यान तेथे तीन मोठ्या केमिकलच्या टाक्या आढळून आल्या. या ठिकाणाहून १२ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी जितेंद्र ठाकूर (वय ४२, रा. धुळे) याच्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पिंपळनेरचे अप्पर तहसीलदार अधिकार पेंढारकर यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई झाली. पुरवठा निरीक्षक विशाल कांगणे, मंडळ अधिकारी रोहित झोडगे, प्रवीण पवार, राजाराम पावरा, ग्राम महसूल अधिकारी भारत देसले, साक्री पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दीपक वळवी, शांतीलाल पाटील, आनंद चव्हाण, रोहित चित्ते आणि योगेश पिसे सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Drought Relief: पाच हजारांची मदत ७३ लाख शेतकऱ्यांना;फडणवीस : उर्वरितांना दोन दिवसांत रक्कम मिळणार

Satara Farmer Loan Waiver: सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ३४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ, चौथी यादी जाहीर

Navi Mumbai: माजी मंत्र्याचा अनधिकृत कारभार? मोरबे धरण क्षेत्रात अलिशान फार्म हाऊसची उभारणी, नवा वाद पेटण्याची शक्यता

Latest Marathi News Live Update : बॅलेट पेपर वापरूनही काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही, तर तुमची मागणी मागे घ्याल का? - अश्विनी वैष्णव

IPL 2027 Trade: चेन्नई सुपर किंग्सने हार्दिक पांड्याला 'ठेंगा' दाखवला; SRH चे दोन तगडे खेळाडू आपल्या संघात घेतले, त्याबदल्यात कोणाला दिले?

SCROLL FOR NEXT